- सायली डिंगरे-लुकतुके
केरळमध्ये हिंदुंच्या लोकसंख्येपेक्षा मुसलमानांची लोकसंख्या अर्धी आहे; मात्र मुसलमानांकडून सर्वाधिक मुले जन्माला घातली जात आहेत. केरळमध्ये जन्माला येणारी सुमारे ४४ टक्के मुले मुसलमान आहेत. दुसरीकडे मुसलमानांमध्ये मृत्यूची संख्या त्यांच्या लोकसंख्येच्या तुलनेत खूपच अल्प आहे. यामुळे हिंदुंच्या तुलनेत मुसलमानांच्या लोकसंख्येत प्रतिवर्षी वाढ होत आहे. मुसलमानांची वाढ हिंदुंपेक्षा ५ पटींनी अधिक आहे, असा अहवाल ‘सेंटर फॉर पॉलिसी स्टडीज’च्या (Center for Policy Studies) वतीने प्रकाशित करण्यात आला आहे. ‘भारतातील धार्मिक लोकसंख्याशास्त्र: वाढता धार्मिक असमतोल’, असे या अहवालाचे नाव आहे. (Population Jihad)
केरळच्या लोकसंख्येत दरवर्षी १ लाखांहून अधिक मुसलमानांची भर पडत आहे. वर्ष २०२१ मध्ये १ लाख ४ हजार मुसलमान लोकसंख्या वाढली आहे. हिंदुंची लोकसंख्या केवळ १ हजार ९९ ने वाढली आहे. ख्रिस्ती लोकसंख्या ६ हजार २१८ ने कमी झाली आहे. या अहवालात वर्ष २००८ ते २०२१ पर्यंत केरळमधील हिंदू, मुसलमान, ख्रिस्ती आणि इतर समुदाय यांच्या लोकसंख्येचा अभ्यास करण्यात आला आहे. या अहवालात नवीन जन्म, मृत्यू आणि या समुदायांमधील लोकसंख्येवर त्यांचा होणारा परिणाम यांबद्दल चर्चा करण्यात आली आहे. (Population Jihad)
(हेही वाचा – भगूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर जन्मस्थान स्मारकाला Satyaki Savarkar यांची भेट)
काय सांगते आकडेवारी ?
१९५० पासून केरळमध्ये (Kerala) मुसलमानांची लोकसंख्या वाढतच चालली आहे. वर्ष २००१ ते २०११ या काळात केरळमध्ये हिंदू लोकसंख्या केवळ २.२३ टक्के आणि ख्रिस्ती लोकसंख्या फक्त १.३८ टक्के वाढली, तर या काळात मुसलमानांची लोकसंख्या १२.८ टक्के वाढली. २००८ ते २०२१ या काळात केरळमध्ये मृत्यूमुखी पडणाऱ्या मुसलमानांचे प्रमाण सुमारे २० टक्के होते, जे त्यांच्या २६.५ टक्के लोकसंख्येपेक्षा खूपच कमी आहे. या उलट हिंदुंमध्ये मृत्यूचे प्रमाण अनुमाने ६० टक्के आहे. (Population Jihad)
२०१६ पासून जन्मदर वाढला
२०१६ पासून केरळमधील मुसलमानांमध्ये मुले जन्माला येण्याचे प्रमाण वाढले आहे. वर्ष २०१६ मध्ये केरळमध्ये २ लाख ७ हजार हिंदू मुले जन्माला आली, तर याच काळात २ लाख ११ हजार मुसलमान मुले जन्माला आली. वर्ष २०१७ मध्येही अशीच परिस्थिती होती. तेव्हा २ लाख १० हजार ७१ हिंदू मुले जन्माला आली होती, तर मुसलमानांची २ लाख १६ हजार ५२५ मुले जन्माला आली होती. वर्ष २०२० पर्यंत असेच चालू राहिले. केवळ वर्ष २०२१ हे हिंदू मुलांची संख्या वाढण्याचे वर्ष होते. (Population Jihad)
(हेही वाचा – 31 Maoists killed : छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत ३१ नक्षलवादी ठार, २ जवान हुतात्मा)
लोकसंख्या ४४ टक्क्यांनी वाढली
हिंदू लोकसंख्या सुमारे ५५ टक्के अणि मुसलमान लोकसंख्या अंदाजे २७ टक्के आहे. २००८ मध्ये केरळमध्ये जन्मलेल्या मुलांमध्ये ४५ टक्के हिंदू होते, तर ३६ टक्के मुसलमान होते. ख्रिस्ती मुलांचे प्रमाण १७.५ टक्के होते; परंतु वर्ष २०२० पर्यंत, एकूण जन्मांमध्ये हिंदू मुलांचा वाटा ४१.४ टक्क्यांपर्यंत अल्प झाला, तर त्याच काळात एकूण जन्मांमध्ये मुसलमान मुलांचा वाटा ४४ टक्क्यांपर्यंत वाढला. (Population Jihad)
केरळची सामाजिक स्थिती
केरळच्या सामाजिक स्थितीविषयी सांगायचे झाले, तर सत्ताधारी पक्ष कमुनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) विशेषतः जिहादी मुस्लिमांचे तुष्टीकरण करण्यात आघाडीवर आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे मुख्यालय केरळमध्येच होते. या राज्यात जमात-ए-इस्लामी ही आतंकवादी कारवाया करणारी संघटनाही येथे मोठ्या प्रमाणात कारवाया करत असते. या सर्वांना प्रशासन आणि सरकार यांचे सहकार्य असते. गेल्या काही वर्षांतील ही लोकसंख्या वाढ ही नियोजित षडयंत्रच वाटते. (Population Jihad)
(हेही वाचा – Rahul Gandhi यांच्याविरोधात गुन्हा दाखल; जाणीवपूर्वक देशविरोधी वक्तव्य केल्याचा आरोप)
हमासच्या समर्थनार्थ निघाली होती रॅली
गेल्या वर्षी इस्रायल आणि पॅलेस्टाईन युद्धाच्या वेळी जमात-ए-इस्लामीने मलप्पूरममध्ये हमासच्या समर्थनासाठी रॅली आयोजित केली होती. त्या रॅलीला हमास या दहशतवादी संघटनेच्या माजी प्रमुखाने ऑनलाइन माध्यमातून संबोधित केले होते. केरळ हे एक असे ठिकाण आहे, जिथे कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांनी आणि अगदी विधानसभेच्या अध्यक्षाने देखील पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आयोजित केलेल्या रॅलीला उघडपणे पाठिंबा दिला आहे. ‘ग्रीन लाईट’ नावाचा एक समूह केरळ पोलीस दलात आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेला माहिती पुरवल्याबद्दल या गटातील अनेक पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. ही अतिशय स्फोटक परिस्थिती आहे. केरळ हे प्रत्यक्षात साम्यवादी राज्य आहे. ज्या वेळी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर बंदी घातली गेली. तेव्हा पीएफआयचे बहुतांश प्रमुख कम्युनिस्ट पक्षात गेले. त्यामुळे सत्तेत असलेली सीपीएम स्वतःच एक दहशतवादी संघटना बनली आहे. अशा स्थितीत आता षडयंत्रपूर्वक मुसलमान लोकसंख्या वाढवली जात आहे. तेथील हिंदुंचे जीवन किती असुरक्षित झाले असेल, याची यावरून कल्पना येते. (Population Jihad)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community