स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्वातंत्र्य लढ्यात पोर्ट ब्लेअर (Port Blair) येथील सेल्युलर जेलमध्ये तुरुंगवास भोगला ते एखाद्या राष्ट्रीय तीर्थक्षेत्रापेक्षा कमी नाही. सावरकर जिथे राहिले त्या मंदीरासमान असलेल्या खोलीचा पदस्पर्श करण्यासाठी लाखों सावरकरप्रेमी आणि पर्यटक पोर्ट ब्लेअरला भेट देत असतात. मात्र गेल्या दीड-दोन वर्षात विमानाच्या तिकिटाचे दर २५,००० ते ३०,००० रुपये झाल्याने पर्यटकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.
(हेही वाचा – ९५ टक्के Hindu असलेले गोविंदपूर गाव रिकामे करण्याचा Waqf Board चा आदेश)
ट्रीपही परवडणारी नाही
ट्रॅव्हल एजन्सीशी संबंधित चंद्रशेखर देशपांडे यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’शी बोलताना सांगितले की, “काही वर्षांपूर्वी १२-१४,००० रुपयांत पोर्ट ब्लेअरची (Port Blair) ट्रीप होत असे. मात्र आता विमानाचे टिकीटच २५,००० ते ३०,००० इतके झाले आहे. ‘सहा दिवस आणि पाच रात्र’ अशा ट्रीपचा प्रती माणशी खर्च २५००० रुपये आणि केवळ विमान तिकीट ३०,०००, अशी स्थिति असल्याने ट्रीपही परवडणारी राहिली नाही. त्यामुळे आम्ही गेल्या दोन वर्षापासून पोर्ट ब्लेअर ट्रीप आयोजित करणे बंद केले आहे.”
(हेही वाचा – PM Narendra Modi : जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाची नेमकी ‘रणनीती’ काय?)
राज्य सरकारने दिलासा द्यावा
देशपांडे यांच्या ट्रॅव्हल एजन्सीतर्फे ३०-५० पर्यटकांना दरवर्षी पोर्ट ब्लेअरची (Port Blair) सैर केली जात असे. देशपांडे म्हणाले, “विमानाचे दर हे कोरोनानंतर वाढतच गेले ते कमी झालेच नाहीत. दर वाढण्याचे हे काय गौडबंगाल आहे, ते समजत नाही. राज्य सरकारने विमानाच्या दराबाबत काही उपाययोजना करून सावरकरप्रेमींना दिलासा द्यावा,” अशी अपेक्षा देशपांडे यांनी व्यक्त केली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community