निवासी डॉक्टरांच्या संपावर सकारात्मक चर्चा! मंगळवारपासून केवळ निदर्शने

नीट पद्व्युत्तर प्रवेश प्रक्रियेतील दिरंगाईप्रकरणावरुन सोमवारी राज्यभरातील निवासी डॉक्टरांनी बाह्यरुग्ण विभागात सेवा देण्यास नकार देत आंदोलन पुकारलं होतं. मुंबईतील केईएम आणि सायन रुग्णालयातील बाह्यरुग्ण सेवा बंद ठेवण्यात आली होती. मात्र या संपावर रात्री उशिरानं सकारात्मक चर्चा झाल्यानं निवासी डॉक्टर मंगळवारपासून बाह्यरुग्ण विभागात हजेरी लावणार आहेत. मात्र बाह्यरुग्ण सेवा फारशी कोलमडली नसल्याचा दावा रुग्णालय प्रशासनानं केला.

मार्ड या निवासी संघटनेच्या प्रतिनिधींसह वैद्यकीय अधिका-यांनी सरकार तुमच्या मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचं आश्वासन देण्यात आलं. मात्र सरकारकडून अंतिम निर्णय जाहीर का झाला नाही, असा मुद्दा मार्डकडून उपस्थित केला गेला. रुग्ण सेवा लक्षात घेत मंगळवारी कामावर रुजू होण्याचा निर्णय मार्ड संघटनेच्यावतीनं जाहीर करण्यात आला. विरोध म्हणून केवळ निदर्शने केली जातील.

(हेही वाचा आता आरटीपीसीआर चाचणी अवघ्या ३५० रुपयांत)

आरोग्य विभागाचे आवाहन

मुंबईतील कोरोनाच्या ओमायक्रॉन विषाणूचे दोन रुग्ण सापडले आहेत. शिवाय मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील मुंबईतील रहिवासी असलेल्या अजून तीन रुग्णांच्या ओमायक्रॉनचा अहवाल प्रलंबित आहे. त्यामुळे पालिका आरोग्य विभागानं मुंबईतील कोव्हिड रुग्णालयांसह नॉन कोव्हिड रुग्णालयातही खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयीन प्रशासनाला सतर्कता बाळगायला सांगितले आहे. त्यामुळे रुग्णालयीन सेवेवर परिणाम होणार नाही, याची काळजी बाळगण्याचं आवाहनही पालिका मुख्य कार्यालयातून आरोग्य विभागाला करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here