Ayodhya Ram Mandir : अयोध्येच्या भव्य श्रीराम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापनाच्या दिवशी देशभरात ५० हजार कोटींची उलाढाल होण्याची शक्यता

209

अयोध्येत उभारण्यात येत असलेला भव्य दिव्य श्रीराम मंदिरात (Ayodhya Ram Mandir) २२ जानेवारी रोजी श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होत आहे. या दिवशी देशभरात उत्सव साजरा होणार आहे. त्याची जोरदार जय्यत तयारी सुरु आहे. देशभरातून या दिवशी तब्बल ५० हजार कोटींची उलाढाल होणार असल्याचा अंदाज आहे.

(हेही वाचा Shivsrushti : महाराष्ट्रातील ‘शिवसृष्टी’ला गुजरात सरकारकडून ५ कोटींची मदत)

असा व्यापार वाढणार 

व्यापारी संघटना असलेल्या कनफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या (CAIT) अंदाजानुसार २२ जानेवारी रोजी देशभरात ५० हजार कोटी रुपयांचा व्यापार होण्याची शक्यता आहे. त्यासाठी, व्यापाऱ्यांनीही कंबर कसली असून गरजेनुसार वस्तू आणि सामानांची खरेदी-विक्री सुरू केली आहे. कॅटचे राष्ट्रीय नेते प्रवीण खंडेलवाल यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, विश्व हिंदू परिषदेच्या आव्हानानुसार देशभरात १ जानेवारीपासून राम मंदिर प्राणप्रतिष्ठा (Ayodhya Ram Mandir) सोहळ्यासाठी अभियान चालवण्यात येणार आहे. त्यासाठी, देशभरातील लोकांमध्ये उत्साह दिसून येत आहे. त्यामुळेच उद्योग, व्यापार क्षेत्रातही मोठी संधी असल्याचे बोलले जात आहे. अंदाजे २२ जानेवारी रोजी देशभरात ५० हजार कोटी रुपयांची अतिरीक्त उलाढाल होऊ शकते. प्रभू श्रीराम यांच्याशी संलग्नित वस्तूंची मोठी मागणी असून श्रीराम यांची मूर्ती, प्रतिमा, श्री रामध्वज, अंगवस्त्र, रामचित्रांच्या माळा, लॉकेट, राम मंदिराची प्रतिकृती यांसह अनेक बारीक-सारीक वस्तूंना मोठी मागणी आहे. मंदिर प्रतिकृती हार्डबोर्ड, प्लायवूड किंवा लाकडापासून बनविण्यात येत आहे. त्यामुळे, त्यांनाही मोठी मागणी आहे. यातून, स्थानिक महिला व कारागिरांना मोठा रोजगार मिळाला आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.