- प्रतिनिधी
राज्यातील नवीन सरकारच्या शपथविधी सोहळ्यात (Oath Ceremony) काही जण ईव्हीएम मशीनची प्रतिकृती घेऊन गोंधळ घालण्याची शक्यता आहे, अशी माहिती गुप्तचर विभागाला मिळाल्यामुळे आझाद मैदान परिसरात तसेच सोहळ्यासाठी येणाऱ्याची कडक तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान शपथविधी सोहळ्यात कुठलाही अनर्थ घडू नये यासाठी मुंबई पोलिसांकडून दक्षता घेण्यात येत आहे.
(हेही वाचा – Border Gavaskar Trophy, Adelaide Test : ॲडलेडची दिवस – रात्र कसोटीच या मालिकेचं भवितव्य ठरवेल?)
राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात मिळालेले यशाला विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात येत असून ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा करण्यात आल्याचा संशय अनेकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. राज्यासह संपूर्ण देशात ईव्हीएम मशीनला घेऊन अनेक तर्क वितर्क काढण्यात येत आहे. दरम्यान राज्यात नवीन महायुतीचे सरकार स्थापन होत असून ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी राज्य सरकारची शपथविधी सोहळा (Oath Ceremony) मुंबईतील आझाद मैदानात पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच इतर राज्यातील मुख्यमंत्री, मंत्री तसेच देशभरातील उद्योगपती, प्रतिष्ठित नागरिकांसह हजारोच्या संख्येने नागरिक या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहे.
(हेही वाचा – Maharashtra Oath Ceremony: ११ डिसेंबरला उर्वरित मंत्र्याचा शपथविधी होणार, अजित पवारांची माहिती)
या सोहळ्याला (Oath Ceremony) गालबोट लागू नये यासाठी सुरक्षा यंत्रणांकडून योग्य ती दक्षता घेतली जात असताना गुप्तचर यंत्रणेला मिळालेल्या माहितीनुसार या सोहळ्यात काही जण ईव्हीएम मशीनची प्रतिकृती घेऊन गोंधळ घालण्याची शक्यता आहे. या माहितीच्या आधारे आझाद मैदान परिसरात सुरक्षा व्यवस्था अधिकच चोख करण्यात आली आहे. सोहळ्यासाठी येणाऱ्यांना मोबाईल फोन शिवाय कुठलीही वस्तू सोहळ्याच्या (Oath Ceremony) ठिकाणी घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक प्रवेशद्वारावर पोलिसांकडून कडक तपासणी करण्यात येणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण आझाद मैदान परिसराची संपूर्ण तपासणी सुरक्षा यंत्रणांकडून करण्यात आली असून परिसरात ४ हजार पोलिसांची फौज तैनात करण्यात आली आहे. त्याचबरोबर एस. आर. पी. एफ. प्लाटून, जलद प्रतिसाद पथक (क्युआरटी), दंगल नियंत्रण पथक, डेल्टा, कॉम्बॅक्ट, बीडीडीएस पथक अशा चोख पोलीस बंदोबस्ताचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community