दिवाळी फराळ परदेशात पाठविण्यासाठी Post Department सज्ज

131
दिवाळी फराळ परदेशात पाठविण्यासाठी Post Department सज्ज

परदेशातील नातेवाइकांना दिवाळीच्या फराळाचा आनंद घेता यावा म्हणून फराळ त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी टपाल विभाग (Post Department) यंदा सज्ज आहे. दिवाळीनिमित्त अमरावती टपाल विभागाने नावीन्यपूर्ण उपक्रम राबविला आहे. फराळाचे पदार्थ दिल्यानंतर ते नाममात्र किमतीमध्ये पॅकेजिंग करून माफक दरात परदेशात पाठवण्याची सोय केली आहे.

(हेही वाचा – Commonwealth Games 2026 : राष्ट्रकूल खेळांतून हॉकी, बॅडमिंटन, टेनिस, नेमबाजी या खेळांची गच्छंती)

अनेकदा दिवाळीचा फराळ तयार असतो; पण तो पाठविण्याचा मुहूर्त लागत नाही, तसेच अनेक जण दैनंदिन कामातून वेळ काढून टपाल कार्यालयामध्ये येऊ शकत नाहीत, अशा नागरिकांसाठी घरी येऊन फराळ पार्सल घेऊन जाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी पोस्टमन घरी येऊन फराळाच्या पदार्थांचे पार्सल विनामूल्य घेऊन जातील. (Post Department)

(हेही वाचा – Vivah Muhurat : नोव्हेंबरपासून उडणार लग्नाचा बार; आठ महिन्यांत लग्नाचे ५२ मुहूर्त !)

नोकरी आणि शिक्षणानिमित्त विदर्भातून परदेशामध्ये जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. परदेशामध्ये वास्तव्यास असलेल्या प्रत्येकालाच दिवाळीच्या सणासाठी भारतामध्ये येणे शक्य होत नाही. ही बाब ध्यानात घेऊन जगभरातील प्रियजनांना फराळाचे पदार्थ आणि भेटवस्तू पाठवून त्याचा दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी करण्यासाठी टपाल विभागाने (Post Department) हे पार्सल परदेशात पोहोचवण्याची जबाबदारी उचलली आहे. अमरावती शहरातील सर्व टपाल कार्यालयांमध्ये दिवाली फराळ परदेशामध्ये पाठवण्याची सुविधा तसेच तेथे फराळाचे पॅकिंग करण्याची सोयही उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन पोस्ट विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.