भविष्याचा विचार करून नागरिक विविध बॅंकेच्या योजना, म्युचुअल फंड, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असतात. तुम्हीसुद्धा बचत सुरू करण्याचा विचार करत असाल तर भारतीय पोस्ट खात्याच्या विविध बचत योजना तुम्हाला फायदेशीर ठरू शकतात. विशेष म्हणजे सरकारी योजनेत गुंतवणूक करणे सर्वात जास्त सुरक्षित असते. देशात पोस्ट ऑफिस अनेक प्रकारच्या सुविधा प्रदान करते पोस्ट ऑफिस गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम पर्याय मानला जातो. मुलांच्या शिक्षणापासून लग्नापर्यंत नियोजन करायचे असल्यास तुम्ही पोस्ट ऑफिसच्या चाइल्ड लाईफ इन्शुरन्समध्ये (बाल विमा योजना) यामध्ये गुंतवणूक करू शकता.
( हेही वाचा : सावधान! ३१ डिसेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्सवर बंद होणार व्हॉट्सअॅप!)
सरकारने बाल विमा योजना ही लहान मुलांसाठी सुरू केली आहे. पालक मुलांच्या नावावर बाल विमा योजना खरेदी करू शकतात. या योजनेत फक्त दोन मुलांचा समावेश होतो. ४५ वर्षांहून अधिक वय असल्यास पालक त्यांच्या मुलांसाठी ही योजना खरेदी करू शकत नाहीत.
योजनेसाठी मुलांचा वयोगट
या योजनेमध्ये ५ ते २० वर्षांपर्यंतच्या मुलांचा समावेश होतो. यास मासिक, सहा महिने आणि वार्षिक आधारावर प्रिमियम भरता येतो. या योजनेअंतर्गत ६ रुपयांपासून १८ रुपयांपर्यंत तुम्ही दैनंदिन प्रिमियम जमा करू शकता. या प्लॅनमध्ये मॅच्युरिटीवर १ लाख रुपयांचा विमा लाभ दिला जातो.
बाल विमा योजनेची वैशिष्ट्ये
- या योजनेचा लाभ फक्त कुटुंबातील दोन मुलांना मिळू शकतो.
- गुंतवणुकीसाठी मुलांचे वय ५ ते २० वर्षांच्या दरम्यान असावे.
- पॉलिसी खरेदी करताना पॉलिसीधारकाचे ( पालकांचे) वय ४५ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
- जर पॉलिसी धारकाचा मृत्यू मुदतपूर्तीपूर्वी झाला, तर अशा परिस्थितीत मुलाला पॉलिसीसाठी प्रीमियम भरावा लागणार नाही. पॉलिसीची मुदत संपल्यानंतर, मुलाला पूर्ण मॅच्युरिटी रक्कम दिली जाईल.
- यावर कर्जाचा लाभ दिला जात नाही.