पोस्टाच्या योजनेत २६७ रुपये गुंतवा, २.४४ लाखांपर्यंत परतावा मिळवा! काय आहे ही भन्नाट सरकारी योजना

विष्याचा विचार करून नागरिक विविध बॅंकेच्या योजना, म्युचुअल फंड, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असतात. तुम्हीसुद्धा बचत सुरू करण्याचा विचार करत असाल तर भारतीय पोस्ट खात्याच्या विविध बचत योजना तुम्हाला फायदेशीर ठरू शकतात. विशेष म्हणजे सरकारी योजनेत गुंतवणूक करणे सर्वात जास्त सुरक्षित असते. पोस्टाच्या अशा अनेक योजना आहेत ज्यात तुम्ही कमी पैशांची गुंतवणूक करून जास्त परतावा मिळवू शकता. ग्रामीण डाक जीवन विमा नावाची अशीच एक योजना आहे या योजनेला ग्राम संतोष म्हणूनही ओळखले जाते.

( हेही वाचा : म्हाडा इमारतींबाबत मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय! हजारो कुटुंबांना दिलासा)

मॅच्युरिटी रकमेसोबत बोनस 

या योजनेत मॅच्युरिटी रकमेसोबत बोनस सुद्धा दिला जातो. ही सरकारी योजना असल्यामुळे तुम्ही यात निश्चितपणे गुंतवणूक करू शकता. ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांसाठी ही योजना आहे. ही योजना घेण्यासाठी तुमच्या रहिवासी प्रमाणपत्रावर ग्रामीण पत्ता असणे आवश्यक आहे. १९ ते ५५ वर्ष वयोगटातील लोक ही पॉलिसी घेऊ शकतात. या पॉलिसीची मुदत ५ ते ४१ वर्ष आहे. तुमची पॉलिसी जितक्या वर्षांसाठी आहे तेवढ्या वर्षांसाठी तुम्ही ग्राम संतोष पॉलिसीचा प्रिमियम भरावा लागेल

ग्राम संतोष पॉलिसीमध्ये तुम्ही १० हजार ते १० लाखांपर्यंतचा विमा प्लॅन घेऊ शकता. पॉलिसीचा प्रमियम त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक आधारावर भरला जाऊ शकतो.

दरमहा २६७ भरा, २ लाख ४४ हजार रुपयांचा परतावा मिळवा 

उदाहरणार्थ, ३० वर्षांच्या एका व्यक्तीने १ लाख रुपयांच्या विमा रकमेची ग्राम संतोष पॉलिसी घेतली आहे. याचा अर्थ या व्यक्तीने ३० वर्षांसाठी हा पॉलिसी टर्म प्लॅन घेतला आहे. संबंधित व्यक्तीला १ लाख रुपयांच्या विम्यासाठी मासिक २६७ रुपये जमा करावे लागतली. अशा प्रकारे ३० वर्षांमध्ये ९४ हजार २० रुपये जमा होतील. या व्यक्तीला ३० वर्षांनंतर १ लाख रुपये मॅच्युरिटी आणि बोनस म्हणून १ लाख ४४ हजार रुपये मिळतील. अशाप्रकारे या व्यक्तीला ३० वर्षांनंतर तब्बल २ लाख ४४ हजार रुपये एवढी एकूण मॅच्युरिटी रक्कम मिळेल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here