दहावी-बारावी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना भारतीय टपाल विभागात नोकरीची सुवर्णसंधी आहे. भारतीय टपाल विभागात ९८ हजारांहून अधिक पदांवर भरती करण्यात येणार आहे. इंडिया पोस्ट वेब पोर्टलवर पोस्टमन, मेल गार्ड, मल्टि-टास्किंग स्टाफ इत्यादी पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत एकूण ९८ हजार ८३ रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवार indiapost.gov.in या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख थोड्याच दिवसात जाहीर करण्यात येईल.
( हेही वाचा : इलेक्ट्रिक वाहनांना आग का लागते? केंद्रीय समितीने अहवाल केला सादर)
एकूण पदे – ९८ हजार ८३
- पोस्टमन – ५९ हजार ९९
- मेलगार्ड – १ हजार ४४५
- मल्टि-टास्किंग (MTS) – ३७ हजार ५३९
भारतातील २३ सर्कलमध्ये भरती
भारतातील टपाल विभागात एकूण ९८ हजार ८५ पदांसाठी भरती केली जाणार आहे. दहावी-बारावी उत्तीर्णांना यासाठी अर्ज करता येणार आहे. पोस्ट ऑफिसमधील भरती अंतर्गत एकूण २३ सर्कलमधील रिक्त जागांवर भरती केली जाते.
शैक्षणिक पात्रता
टपाल खात्यात नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या तरूणांनी मान्यताप्राप्त मंडळातून दहावीची परीक्षा उत्तीर्ण करणे गरजेचे आहे. यासोबत संबंधिताला संगणकाचे प्राथमिक ज्ञान असणे आवश्यक आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात पोस्टाच्या वेबसाइटवर पहावी.
वयोमर्यादा
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय ३२ वर्षे निश्चित करण्यात आले आहे.
अर्ज प्रक्रिया
भारतीय टपाल विभागाच्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी indiapostgdsonline.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
Join Our WhatsApp Community