अलिकडे अनेक तरूण नोकरीच्या शोधात आहे, अशा सर्वांसाठी आनंदाची बातमी असून पोस्ट विभागात नोकरी करू इच्छिणाऱ्या तरूणांकडून गुजरात पोस्ट सर्कल अंतर्गत विविध क गटाच्या पदांच्या भरतासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पोस्ट विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार पोस्टल असिस्टंट आणि सॉर्टिंग असिस्टंटची ७१ पदे, पोस्टमनची ५६ पदे आणि मल्टी टास्किंग स्टाफच्या ६ जागा भरण्यासाठी एकूण १८८ पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. ही भरती क्रीडा न्यायालयांतर्गत होणार आहे.
( हेही वाचा : संपूर्ण प्रवासात ट्रेनमधील एसी बंद; ५० हजार रुपये भरपाई देण्याचे ग्राहक न्यायालयाचे आदेश! काय आहे नेमके प्रकरण? )
क्रीडा कोटा अंतर्गत पोस्ट विभागात नोकरी करू इच्छिणारे dopsportsrecruitment.in च्या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्जाची प्रक्रिया २३ ऑक्टोबरपासून सुरू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ही २२ नोव्हेंबर २०२२ आहे. यासाठी तुम्हाला १०० रुपये शुल्क भरावे लागेल.
अर्ज करण्यासाठी पात्रता
पोस्ट विभागातील पोस्टल असिस्टंट, पोस्टमन आणि MTS पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार दहावी व बारावी उत्तीर्ण असावेत.
परीक्षेशिवाय निवड
पोस्टल विभाग क्रीडा कोटा भरती अंतर्गत जाहिरात केलेल्या पदांसाठी उमेदवारांची निवड परीक्षा आणि मुलाखतीशिवाय केली जाईल. गुणवत्ता यादी क्रीडा स्पर्धेच्या पातळीनुसार तयार केली जाईल यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर सहाभागी झालेल्या उमेदवारांना प्रथम प्राधान्य दिले जाईल.
Join Our WhatsApp Community