भारतीय टपाल विभागात १० वी उत्तीर्णांना काम करण्याची सुवर्णसंधी आहे. शाखा पोस्ट मास्टर, सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर/डाक सेवक पदांच्या एकूण ४० हजार ८८९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ फेब्रुवारी २०२३ आहे.
( हेही वाचा : दोन मुलांना विष देऊन पित्याने केली आत्महत्या! औरंगाबादमधील धक्कादायक घटना )
अटी व नियम जाणून घ्या…
- पदाचे नाव – शाखा पोस्ट मास्टर, सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर/डाक सेवक
- पदसंख्या – ४० हजार ८८९
- नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत
- वयोमर्यादा – १८ ते ४० वर्ष
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरू होण्याची तारीख – २७ जानेवारी २०२३
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १६ फेब्रुवारी २०२३
- अधिकृत वेबसाईट – www.indiapost.gov.in
महाराष्ट्रासाठी किती जागा?
महाराष्ट्र टपाल विभाग अंतर्गत “ग्रामीण डाक सेवक” पदांच्या एकूण २५०८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा. उमेदवाराचे वय १८ ते ४० वर्षे दरम्यान असावे. नोकरी ठिकाण महाराष्ट्रात कुठेही आहे. याकरता अर्ज शुल्क १०० रुपये आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.