मेडिकल प्रवेशपूर्व परीक्षा १६ जूनला! डॉक्टरांची सर्वोच्च न्यायालयात धाव 

डॉक्टर आजही कोरोना महामारीत दिवस-रात्र  सेवा देत आहेत. वैद्यकीय सेवेतून अजूनही त्यांना उसंत मिळत नाही, अशा परिस्थितीत अवघ्या १९ दिवसांच्या शॉर्ट नोटिशीवर या परीक्षेची घोषणा कशी करण्यात आली, असा प्रश्न याचिकाकर्ते डॉक्टरांनी विचारला आहे. 

इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉरटंन्स कंबाईन इण्टेरन्स टेस्ट परीक्षा १६ जून रोजी जाहीर करण्यात आली आहे. ती कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पुढे ढकलण्यात यावी, या मागणीसाठी एम्सच्या २३ एमबीबीएस डॉक्टरांनी सर्वोच्च न्यायायलात याचिका दाखल केली आहे.

अद्याप डॉक्टर कोविड सेवेत व्यस्त!

डॉक्टर आजही कोरोना महामारीत दिवस-रात्र  सेवा देत आहेत. वैद्यकीय सेवेतून अजूनही त्यांना उसंत मिळत नाही, अशा परिस्थितीत अवघ्या १९ दिवसांच्या शॉर्ट नोटिशीवर या परीक्षेची घोषणा करण्यात आली आहे. डॉक्टर हे फ्रंट लाईन वर्कर म्हणून काम करत आहेत. त्यामुळे त्यांना या परीक्षेसाठी वेळ देण्याची गरज आहे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. या याचिकाकर्त्यांपैकी एक याचिकाकर्ता डॉक्टर हा कोरोना संक्रमणामुळे अत्यवस्त आहे, तसेच बहुतांश राज्यात परीक्षा केंद्रे ही दूरवर असू शकतात, त्यासाठी डॉक्टरांना लांबचा प्रवास करावा लागणार आहे. अनेक राज्यांतील डॉक्टरांचे अद्याप लसीकरण झाले नाही. त्यातील अनेक डॉक्टरांनी पहिली लसही घेतलेली नाही, असेही या याचिकेत म्हटले आहे.

(हेही वाचा : राजकीय पक्षांना नाही कोरोनाचं सोयरसुतक!)

अन्य परीक्षांबाबत एक न्याय आणि आम्हाला दुसरा न्याय! 

पंतप्रधान कार्यालयाने १०वी, १२वीच्या परीक्षा रद्द केल्या, कलल्या जात आहेत.नीट पी जी परीक्षा १ महिना पुढे ढकलली आहे  ती ऑगस्ट महिन्यात होणार आहे. या परीक्षार्थींसाठी परीक्षेची तयारी करण्यासाठी किमान १ महिना मिळणार आहे. मग आमचीच परीक्षा लवकर घेण्यासाठी आग्रह का धरला जात आहे?, असा प्रश्न डॉक्टरांनी विचारला आहे.

काय आहे आयएनआय सीईटी परीक्षा?

आयएनआय सीईटी ही पद्व्युत्तर अभ्यासक्रमासाठीची प्रवेशपूर्व परीक्षा आहे. एम्स, जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च, पद्दुचेरी, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरो सायन्स, बंगळूरु या देशातील प्रगत विद्यापीठांसाठी ही परीक्षा घेण्यात येते. यंदाच्या वर्षी ८० हजार डॉक्टर देशभरातून ही परीक्षा देणार आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here