मुंबईतील रस्त्यांवर पावसाळ्यात निर्माण होणारे खड्डे बुजवण्यासाठी महापालिकेच्या वतीने परिमंडळ निहाय कंत्राटदारांची निवड करण्यात आली आहे. मुंबईतील प्रत्येक परिमंडळांमध्ये ९ मीटर पेक्षा अधिक रुंदीचे रस्ते आणि ९ मीटर पेक्षा कमी रुंदीचे रस्ते आदींकरता स्वतंत्र कंत्राटदारांची निवड करण्यात आली असून केवळ शहर भागांमध्ये पावसाळ्यातील खड्डे बुजवण्यासाठी तब्बल ४३ कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे. (Pothole Free Road)
मुंबई महापालिकेच्यावतीने महापालिकेच्या हद्दीतील लहान व मोठ्या रस्त्यांवर खड्डे भरण्याची कामे पावसाळ्यात दरवर्षी केली जातात. खड्ड्यांचे प्रमाण पावसाळ्यात कमी व्हावे म्हणून पावसाळ्या पूर्वी, पावसाळ्या दरम्यान आणि पावसाळ्यानंतर सुरक्षात्मक उपाय म्हणून रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम केले जाते. महापालिकेच्या कुलाबा ते भायखळा, ग्रॅटरोड मुंबई सेंट्रल या परिमंडळ एक आणि महालक्ष्मी, लालबाग ते धारावी, शीव या परिमंडळ दोन मधील लहान व मोठ्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी कंत्राटदारांची निवड करण्यात आली आहे. यंदा हे खड्डे भरण्यासाठी मास्टिक असफाल्ट तंत्राचा वापर केला जात असून ९ मीटर पेक्षा अधिक रुंदीच्या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची जबाबदारी रस्ते विभागाची असून त्याखालील छोट्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याची जबाबदारी ही संबंधित प्रशासकीय विभाग कार्यालयाची आहे. (Pothole Free Road)
त्यामुळे शहर भागांमधील दोन परिमंडळांमधील लहान व मोठ्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी चार कंपन्यांची निवड करण्यात आली असून त्यासाठी तब्बल ४३ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी सिमेंट काँक्रिटची कामे हाती घेण्यात आली असून पहिल्या टप्प्यातील ४०० किलोमीटरच्या रस्ते कामांपैंकी शहर भागांसाठी नेमलेल्या कंत्राटदारावर कारवाई करण्यात आल्याने या रस्ते कामांसाठी नव्याने निविदा काढण्यात येत आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यातील सुमारे ४०० किमी लांबीच्या रस्ते कामांसाठीचीही निविदा प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे इतर भागांमध्ये सिमेंट काँक्रिटच्या कामांसाठी कंत्राटदारांना नेमण्यात आले असले तरी शहर भागांतील रस्त्यांसाठी अद्यापही कंत्राटदारांना नेमण्यात न आल्याने या रस्त्यांवरील खड्ड्यांची जबाबदारी महापालिकेची राहणार आहे. त्यामुळे शहर भागातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी सुमारे ४३ कोटी रुपये खर्च केले जाणार असल्याचे म्हटले जात आहे. (Pothole Free Road)
(हेही वाचा – Hawkers Action : फेरीवाल्यांवरील महापालिकेच्या कारवाईमुळे बोरीवलीकर खुश, मानले आमदारांचेच धन्यवाद)
९ मीटर पेक्षा अधिक रुंदीचे रस्ते
परिमंडळ १ : कंत्राटदार : प्रिती कंट्रक्शन (१३.१९ कोटी रुपये)
परिमंडळ २ : कंत्राटदार : ग्यान कंट्रक्शन (१३.१५ कोटी रुपये)
९ मीटर पेक्षा कमी रुंदीचे रस्ते
परिमंडळ १ : कंत्राटदार : वरूण कंट्रक्शन (०९.९० कोटी रुपये)
परिमंडळ २ : कंत्राटदार : ग्यान कंट्रक्शन (०७.९२ कोटी रुपये)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community