मुंबईत खड्डे भरण्याच्या कामात देखरेख ठेवण्यासाठी महापालिकेच्या वतीने मोबाईल ॲप्लिकेशन सुरू करण्यात आले आहे. मात्र, महापालिकेने खड्डे बुजवण्याच्या कामात हा निर्णय घेतला असला तरी मुंबईतील रस्त्यावरील खड्डे नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी ४८ तासांत खड्डे न भरणाऱ्या रस्ते अभियंत्यांना (Road Engineer) प्रतिदिन १००० रुपये दंड आकारण्याची मागणी होत आहे. यापूर्वी नियोजित वेळेत खड्डे न बुजवणाऱ्या रस्ते अभियंता यांना दंडात्मक कारवाई केली जात असे. (Pothole)
भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर (Makrand Narvekar) यांनी अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. नार्वेकर यांनी या पत्रात असे म्हटले आहे की, मोबाईल ॲप्लिकेशन सुरू करणे ही बाब स्वागतार्ह असले तरी, महापालिकेचे अभियंते आणि कंत्राटदारांना खड्डे बुजविण्यासाठी निर्धारित वेळ पाळणे महत्त्वाचे आहे. आणि तसे न करणाऱ्या अभियंत्यांना आणि कंत्राटदाराना दंड आकारण्यासाठी करणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. जे रस्ते अभियंते खड्ड्यांची तक्रार आल्यापासून ४८ तासात खड्डा भरणार नाहीत, त्यांना प्रतिदिन प्रति खड्डा १००० रुपये दंड आकारणी करावी, असे नार्वेकर म्हणाले. (Pothole)
(हेही वाचा – Election Commission : लोकसभेच्या निवडणुकीत हिंसाचार आणि फेरमतदान घटले)
महापालिकेने २२७ प्रभागांसाठी प्रत्येकी एक उपअभियंता आणि प्रत्येक झोनसाठी एक कंत्राटदार (Contractor) हा खड्ड्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी नियुक्त केले आहे. हे जरी कागदावर चांगले असले तरी, निर्धारित कालावधीत काम पूर्ण न झाल्यास दंड आकारण्याची तरतूद असावी, असेही ते म्हणाले. खड्डे भरण्याच्या या प्रक्रियेबाबत एक लाईव्ह डॅशबोर्डही (Dashboard) बीएमसीने नागरिकांना पाहण्यासाठी लावावा अशी मागणी त्यांनी केली. नागरिकांना त्यांनी केलेल्या तक्रारी, त्यावर केलेली कारवाई आणि खड्डे (Pothole) भरण्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य याबद्दल अपडेट मिळायला हवे. ह्या उपाययोजनांमुळे नागरिकांना या पावसाळ्यात खड्डे मुक्त प्रवास देण्याच्या महापालिकेच्या प्रयत्नांवर विश्वास बसेल, असेही नार्वेकर म्हणाले. (Pothole)
महापालिकेने आपले रस्ते काँक्रिटीकरणाचे (Road Concrete) उद्दिष्ट साध्य केले नाही आणि दक्षिण मुंबईमध्ये काँक्रिटीकरणाचे कोणतेही काम सुरू झालेले नाही. अनेक कामे पूर्ण झाली नसल्यामुळे संपूर्ण शहरात खड्ड्यांच्या अनेक तक्रारी अपेक्षित आहेत. त्यामुळे नागरिकांनी विश्वास ठेवावा, अशा खड्डे भरण्याच्या परिपूर्ण यंत्रणेची गरज असल्याचेही कुलाब्याचे माजी नगरसेवक नार्वेकर म्हणाले. (Pothole)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community