Goregaon Bus Depot खड्ड्यात, उपक्रमाकडे खड्डे बुजवायला पैसे नाहीत?

1074
Goregaon Bus Depot खड्ड्यात, उपक्रमाकडे खड्डे बुजवायला पैसे नाहीत?

मुंबई महापालिकेच्या अनुदानावर तरलेल्या बेस्ट उपक्रमाला आता आपल्या किरकोळ देखभालीचा खर्चही आता भागवण्याची हिंमत होत नाही. गोरेगाव पूर्व येथील बस आगारात (Goregaon Bus Depot) चक्क खड्ड्यात आगार की आगारात खड्डे अशी म्हणण्याची वेळ आली असून बस चालक तर अगदी जिवावर उदार होऊन बस चालवत असून त्या खड्ड्यातून प्रवास करताना प्रवाशांचा जीव मेटाकुटीला येते. मात्र, बेस्ट उपक्रमाकडे वारंवार तक्रार करूनही या आगारातील खड्डे बुजवले जात नाही. त्यामुळे हा बेस्ट प्रमाणे हा आगारही खड्ड्यात घालायचा आहे का असा संतप्त सवाल प्रवाशांकडून केला जात आहे.

गोरेगाव पर्वे येथील बेस्ट बस आगारामध्ये (Goregaon Bus Depot) मोठ्याप्रमाणत खड्ड्यांची विवरे तयार झालेली नसून पावसाळ्यापूर्वीच या खराब झालेल्या भागाची मलमपट्टी न झाल्याने मुसळधार पाऊस धारेने हा आगारातील या खराब जागेवर मोठे मोठे खड्डे निर्माण झालेले आहे. त्यामुळे या गोरेगाव बस आगारातील या खड्ड्यांमुळे आधीच बेस्ट बसेसचे किरकोळ सुटे भाग बदलण्यास पैसे नाहीत तिथे या बसेस आणखीन खिळखिळ्या करून त्या बसेस नादुरुस्त करण्याचे काम केले जात आहे.

(हेही वाचा – Sharad Pawar : शिंदे – पवार भेटीत नक्की काय दडलं आहे? धारावी अदानीला देणे की राजकीय डाव टाकणे?)

विशेष म्हणजे या आगारातील (Goregaon Bus Depot) या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी एवढे जमा होते की प्रवाशांना आगारांमध्ये या खड्ड्यांत जमा होणाऱ्या पाण्यातून जावे लागते. त्यामुळे नागरिक अधिक त्रस्त झाले असून या पाण्यातून चालताना बस बाजूने जाताना प्रवाशांच्या अंगावर या पाण्याचा अभिषेक केला जातो. त्यामुळेही नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला असून वारंवार आगार प्रमुखांकडे तक्रार करूनही याची आगारातील रस्त्याची डागडुजी केली जात नाही.

प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, आगार प्रमुखाकडे (Goregaon Bus Depot) याची तक्रार केल्यानंतर याची बाबत आपण वर कळवले असून त्यानुसार त्याची डागडुजी केली जाईल असे सांगितले जाते. परंतु एक महिना झाला तरी याची डागडुजी झालेली नाही, असे प्रवाशांचे म्हणणे आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.