- सचिन धानजी, मुंबई
मुंबईतील रस्त्यांवर पडणाऱ्या खड्ड्यांचे (Potholes) प्रमाण कमी करण्यासाठी रस्ते सिमेंट काँक्रिटचे करण्याचा प्रयत्न महापालिकेच्यावतीने केल जात असतानाच दुसरीकडे डांबरी रस्त्यांसह सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यावर पडणाऱ्या खड्ड्यांसाठी नवीन प्रयोग केला जाणार आहे. डांबरी रस्त्यांवरील खड्ड्यांसाठी जुन्या वापरलेल्या डांबरावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर केला जाणार असून यासाठी महापालिकेच्यावतीने इन्फ्रारेड रिसायकलिंग मशिनची खरेदी केली जात आहे.
(हेही वाचा – MHADA : म्हाडा कोकण मंडळाची सुमारे १४ हजार घरे विक्रीअभावी पडून; सुमारे ३ हजारांचा निधी पडला अडकून)
मुंबई महापालिकेच्यावतीने खड्डे (Potholes) तथा रस्ते दुरुस्तीसाठी एक रिसायकलिंग मशीनची खरेदी केली जात असून या मशीनद्वारे खड्डे दुरुस्तीबरोबरच दाग, रुटींग, तडे तथा चिरा (क्रॅक्स), तुटलेल्या कडा आदींची दुरुस्ती करू शकते. या तंत्रज्ञानाद्वारे जुने पुनरुत्पादित केलेले हॉट मिक्स बीसी आणि नवीन हॉट मिक्स बीसी हे नवीन इन्फ्रारेड किरणांद्वारे समान तपामानावर आणून कॉम्पॅक्ट केले जाते. या मशीनच्या सहाय्याने विविध खड्डे बुजण्यासाठी लागणारे साहित्य, रस्ता सुरुक्षा उपकरणे, कंपन पेल्ट कॉम्पॅक्टर या सर्वांना एकाच कंटेनरच्या छोट्या ट्रकमध्ये समाविष केले जाईल. या इन्फ्रारेड रिसायकलिंग मशीनच्या खरेदीसाठी निविदा मागवण्यात आली असून यामध्ये प्रिती कंस्ट्रक्शन कंपनीला मशीनची खरेदी आणि दोन वर्षांची देखभाल व दुरुस्ती आदींकरता ७.१७ कोट रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
(हेही वाचा – Delhi Assembly Election : आता लक्ष्य दिल्ली विधानसभा निवडणूक)
या कंपनीने अंदाजित दरापेक्षा ३४.१४ टक्के दराने म्हणजे ९.५१ कोटी रुपयांची बोली लावून काम मिळवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यानंतर केलेल्या वाटाघाटीनंतर संबंधित कंपनीने विविध करांसह ७.१७ कोटी रुपयांमध्ये हे काम करण्यास तयारी दर्शवली आहे. यामध्ये मशीनची खरेदीची किंमत जीएसटीसह १.४७ कोटी रुपये एवढी असून त्यावरील खर्चासाठी ४.२७ कोटी रुपये तसेच एक वर्षांच्या हमी कालावधीनंतर एक वर्षांच्या देखभालीसाठी ६० हजार रुपये अशाप्रकारे ७.२७ कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. (Potholes)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community