मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे ४८ तासांमध्ये बुजवण्याचे निर्देश देत महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी हे खड्डे बुजण्यासाठी कोणत्याही साहित्याचा वापर करा, अशाही सूचना केल्या आहे. मात्र, रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी कोल्डमिक्सचा वापर केला जात असला तरी या कोल्डमिक्सचे टायमिंग चुकीचे असल्याने ते पूर्णपणे फोल ठरताना दिसत आहे. कोल्डमिक्सने भूक क्षमत नसल्याने आता हे खड्डे पेव्हरब्लॉकने आपली भूक भागवताना दिसत आहे. आता पेव्हर ब्लॉकबरोरबच आता या खड्ड्यांमध्ये सिमेंटचे रेडीमिक्स नाही तर दगड विटांचा भराव टाकून हे खड्डे बुजवले जात आहेत.
खड्डे बुजवण्याची तात्पुरती मलमपट्टी
मुंबईत मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांवरील खड्ड्यांचे प्रमाणही वाढू लागले आहे. त्यामुळे हे खड्डे बुजवण्याचे काम महापालिकेच्या विभाग कार्यालयाच्यावतीने होत असेल तर ज्या खड्ड्यांची नोंदणी नाही ते खड्डे बुजवले जात नव्हते. परंतु गुरुवारी महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी आपत्कालिन व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर या खड्डे बुजवण्याच्या कामाला गती प्राप्त झाली आहे. चहल यांनी गोल्डमिक्स नसेल, तर इतर साहित्यांचा वापर करून खड्डे बुजवण्याचे निर्देश दिले, त्यानंतर महापालिकेच्या विभागीय स्तरावर ज्या ज्या रस्त्यांवर खड्डे आढळून आले आहेत, त्या त्या रस्त्यांवर सिमेंटच्या रेडीमिक्स, कुठे कोल्ड मिक्स तर काही ठिकाणी पेव्हर ब्लॉक लावून खड्डे बुजवण्याची तात्पुरती मलमपट्टी करण्यात येत आहे.
(हेही वाचा शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, प्रवक्तेपदावरुन राऊतांचा पत्ता कट! पक्षप्रमुखपदी कोण?)
पेव्हर ब्लॉक बसवून तात्पुरते खड्डे बुजवले जात
मुंबई महापालिकेने ज्या रस्त्यांच्या कामासाठी कंत्राटदार नियुक्त केले आहेत, त्या त्या संबंधित रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याची जबाबदारी कंत्राटदारांची आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदार हे कोल्ड मिक्सचा वापर न करता त्यावर पेव्हर ब्लॉक बसवून तात्पुरते खड्डे बुजवण्याचे काम करत आहेत. तर जे रस्ते हमी कालावधीत नाहीत, अशा रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये कोल्ड मिक्सचा वापर केला जात आहे. मुंबईतील बहुतांशी रस्त्यांवर कोल्ड मिक्सचा वापर योग्य प्रकारे होताना दिसत नाही. कोल्ड मिक्स हे पावसाळ्यात खड्डे भरण्यासाठी पूर्णपणे निष्फळ ठरलेले आहे आणि त्यामुळेच पेव्हर ब्लॉक बसवून या खड्ड्यांची तात्पुरती मलमपट्टी करण्यावर कंत्राटदार आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा भरणा दिसून येत आहे. दादरमधील मनमाला टॅंक रोड, सेनापती बापट चौक, ज्ञान मंदिर रोड आदी ठिकाणी पेव्हर ब्लॉकचा वापर खड्ड्यांमध्ये केलेला पाहायला मिळत आहे. अनेक भागांमध्ये सुद्धा कोड मिक्सचा वापर योग्य प्रकारे होत नसल्याने पेव्हर ब्लॉक टाकलेले पाहायला मिळत असून जी भूक कोल्ड मिक्सने भागत नाही, ती आता पेव्हर ब्लॉकने खड्डे भागवून घेत असल्याचे दिसून येत आहे.
Join Our WhatsApp Community