विशेष प्रतिनिधी, मुंबई
पवई तलावातील (Powai Lake) जलपर्णी काढण्याचे काम महापालिकेच्यावतीने सुरु असून या तलावातील पाण्यावर तरंगणाऱ्या या वनस्पती या हार्वेस्टर यंत्र तसेच ऍम्फिबिअस यंत्राच्या मदतीने काढून त्याची विल्हेवाट लावण्याचे कंत्राट दिले असले तरी प्रत्यक्षात यासाठी पोकलेन मशिनचाच वापर केला जात असल्याची माहिती मिळत आहे. या ठिकाणची जलपर्णी काढताना घरटी सुरक्षित राहण्याच्या दृष्टिने महानगरपालिका प्रशासनाने शक्यतोवर पोकलेनऐवजी हार्वेस्टर संयंत्राचा वापर करावा, अशी विनंती पक्षी अभ्यासकांकडून करण्यात आली आहे. तरीही पोकलेन मशिनचा वापर केला जात असल्याचे बोलले जात आहे.
(हेही वाचा – Veer Savarkar यांच्या जयंतीनिमित्ताने सावरकर स्मारकात साकारतेय २२२२२ नाण्यांच्या सहाय्याने शिवरायांची प्रतिमा)
पवई तलावातील (Powai Lake) जलपर्णी काढण्यासाठी महापालिकेच्यावतीने कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे तलावातील जलपर्णी काढण्यासाठी विविध करांसह ११.१८ कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत. यासाठी एस.के. डेव्हलपर्स या कंपनीची निवड करण्यात आली असून संपूर्ण जलपर्णी सहा महिन्यांमध्ये काढणे अपेक्षित आणि पुढील १८ महिन्यांमध्ये याची देखभाल करण्याची जबाबदारी या संबंधित कंपनीकडे असेल. या कंपनीची निवड करताना तलावातील जलपर्णी ही हार्वेस्टरर यंत्राद्वारे काढण्यासाठी संबंधित कंपनीला कंत्राट दिले. परंतु याठिकाणी हार्वेस्टर यंत्राऐवजी पोकलेन मशिनचा वापर केला जात असल्याचे बोलले जात आहे.
(हेही वाचा – BMC : डोंगर उतारावर राहत आहात, जबाबदारी तुमचीच; महापालिकेचा इशारा)
तलावाच्या (Powai Lake) काठावरील झाडीझुडपे, तरंगत्या वनस्पती या जलचर पक्ष्यांच्या अधिवासासाठी, घरट्यांसाठी योग्य जागा आहेत. तलावाच्या काठावर शेकाट्या पक्ष्यांची घरटी असल्याचे स्थानिक पक्षीनिरीक्षकांना आढळून आले. त्यामुळे त्या ठिकाणी जलपर्णी काढताना घरटी सुरक्षित राहण्याच्या दृष्टिने महानगरपालिका प्रशासनाने शक्यतोवर पोकलेनऐवजी हार्वेस्टर संयंत्राचा वापर करावा, अशी विनंती अभ्यासकांकडून करण्यात आली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community