मुंबई महानगरपालिकेच्या पवई फिल्टरपाडा येथील पवई जलाशयांमधून (Powai Reservoir) कुर्ला, दादर माहीम, धारावी तसेच पश्चिम उपनगरांतील विलेपार्ले ते जोगेश्वरी पूर्व भागाला पाणी पुरवठा केला जातो. मात्र, या पाणी पुरवठा करणाऱ्या जलाशयांची सुरक्षाच आता अतिक्रमणांमुळे भेदली जात असून या जलाशयांच्या सुरक्षेसाठी असलेल्या संरक्षक भिंतीच आता कमजोर होऊ लागल्या आहेत. त्यामुळे फिल्टर पाड्याच्या परिसरातील अतिक्रमणांमुळे थेट जलाशयांनाच धोका निर्माण झालेला आहे. (Powai Reservoir)
मुंबईला दरदिवशी ४८५० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा करण्यात येत असून मुंबईतील विविध भागांमध्ये सेवा जलाशयांमधून पुरवठा केला जातो. या सेवा जलाशयांमध्ये पवईतील जलाशयांचा समावेश असून पवईतील फिल्टर पाडा परिसरात पवई निम्नस्तरीय जलाशय आणि पवई उच्चस्तरीय जलाशय १ आणि २ ही (Powai Reservoir) जलाशये आहेत. जल अभियंता विभागाच्या अखत्यारीतील असलेली ही जलाशये (Powai Reservoir) एकाच परिसरात आहेत. या परिसरात पवई निम्नस्तरीय जलाशय, विहार जलशुद्धीकरण केंद्र, विविध कर्मचारी वसाहत, पवई उच्चस्तरीय जलाशय एक व दोन यांचा पंप रूम, स्काडा आदींची कार्यालये व इमारतींचा समावेश आहे. (Powai Reservoir)
कुर्ला “एल” भागातील विविध परीसरांस पवई निम्नस्तरीय जलाशय आणि पवई उच्चस्तरीय जलाशय क्र. २ या जलाशयांमधून पाणीपुरवठा होतो आणि महापालिकेच्या विलेपार्ले ते जोगेश्वरी पूर्व या के/पु, दादर, माहीम आणि धारावी या जी/उत्तर विभागात आणि विक्रोळी ते भांडुप, नाहुर या “एस” विभागातील विविध परीसरांस पवई उच्चस्तरीय जलाशय क्रमांक १ या जलाशयामधून पाणीपुरवठा होतो. या जलाशयांचा (Powai Reservoir) भाग डोंगराळ भूभागावर असून जल अभियंता विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या संपूर्ण परिसराच्या संरक्षक भिंतीपैकी अतिक्रमण मुक्त असलेल्या ठिकाणी नवीन संरक्षक तथा आधारभिंत बांधण्यात आलेली आहे. परंतु उर्वरित ठिकाणी अस्तित्वात असलेल्या अतिक्रमणांमुळे तसेच बाहेरील बाजूस असलेल्या झोपडपट्टी वसाहतीमधील घरे ही अस्तित्वात असलेल्या संरक्षक भिंतीला चिटकून बांधण्यात आलेली आहे. या तीव्र उताराच्या भूभागावर बांधण्यात आलेली असल्या कारणाने, संपूर्ण परिसरात कोणतीही अनुचित घटना होऊ नये म्हणून तसेच या सर्व जलाशयांची सुरक्षितता लक्षात घेता येथील संरक्षक भिंतीची पुनर्बांधणी करण्याची वेळ आली आहे. (Powai Reservoir)
(हेही वाचा – Deepak Kesarkar: मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे मराठा समाजाची सहानुभूती कमी होतेय – दीपक केसरकर)
जल अभियंता विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, महापा यासर्व जलाशयांच्या परिसरात संरक्षक भिंतीच्या पुनर्बांधणीचे काम तसेच संपूर्ण आवारात अंतर्गत बाजुमध्ये पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठीची वाहिनी टाकण्याचे काम हाती घेण्यात येत आहे. याच्या तांत्रिकदृष्ट्या अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या पेडणेकर अँड असोशिएट्स यांनी केलेल्या अहवालाचे पुनर्विलोकन व्हीजेटीआयच्या माध्यमातून केले आहे. या तांत्रिक अहवालानुसार या संरक्षक भिंतीसह अंतर्गत भागात पर्जन्य जल वाहिनी टाकण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. (Powai Reservoir)
पवई निम्मस्तरीय व उच्चस्तरीय जलाश क्रमांक १ मधून कुठल्या भागाला होतोय पाणी पुरवठा :
विलेपार्ले ते जोगेश्वरी पूर्व (के/पु), धारावी, माहीम, दादर (जी/उत्तर) आणि विक्रोळी ते भांडुप, नाहुर या “एस” विभागातील विविध परिसरांत
उच्चस्तरीय जलाशय क्रमांक २ मधून कुठल्या भागात होतोय पाणी पुरवठा :
कुर्ला “एल” भागातील विविध परिसरांत (Powai Reservoir)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community