लोअर परळ पुलाचा गर्डर उभारण्यासाठी पाॅवर ब्लाॅक घोषित; ‘या’ लोकल रद्द

132

लोअर परळ पुलाचा गर्डर उभारण्यासाठी पश्चिम रेल्वेने गुरुवारी आणि उद्या मध्यरात्री चार तासांचा ट्रॅफिक आणि पाॅवर ब्लाॅक घोषित केला आहे. हा गर्डर उभारण्यासाठी गुरुवारी रात्री 1.10 ते शुक्रवारी पहाटे 5.10 वाजेपर्यंत सर्व मार्गिकांवर हा ब्लाॅक असणार आहे. या ब्लाॅक कालावधीत काही लोकल फे-या रद्द करण्यात येणार असून काही लोकल फे-यांच्या मार्गात बदल करण्यात येणार आहेत.

ब्लाॅक कालावधी

  • ब्लाॅक कालावधीत गुरुवारी मध्यरात्री 12.30 वाजता बोरिवली- चर्चगेट आणि 1.05 वाजता विरार चर्चगेट धीमी लोकल अंधेरी ते मुंबई सेंट्रलदरम्यान जलद चालवण्यात येणार आहे.
  • पहाटे 4.15 वाजता चर्चगेट- विरार धीमी लोकल 4.36 वाजता दादरहून आणि 4.38 चर्चगेट- बोरिवली धीमी लोकल 5.08 वाजता वांद्रे येथून सुटणार आहे.
  • रात्री 3.25 वाजता विरार-चर्चगेट, 3.40 वाजता नालासोपारा- बोरिवली धीमी, पहाटे 4.05 वाजता भाईंदर-चर्चगेट जलद लोकल, 3.53 वाजता विरार- चर्चगेट जलद या लोकल 15 मीनिटे उशिराने धावणार आहेत.
  • बोरिवली – चर्चगेट लोकल रद्द करुन ही लोकल पहाटे 4.45 वाजता मालाड-चर्चगेट अशी विशेष लोकल धावणार आहे.
  • पहाटे 4.02 वाजता बोरिवली-चर्चगेट धीमी लोकल दादरपर्यंत चालवण्यात येणार आहे. ही लोकल माटुंगा रोड आणि माहिम स्थानकात थांबणार नाही.
  • पहाटे 4.14 वाजता बोरिवली-चर्चगेट धीमी लोकल वांद्रे स्थानकापर्यंत धावणार आहे. याच स्थानकातून या लोकलचा परतीचा प्रवास सुरु होईल.

( हेही वाचा: मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी मनसेचा पोलिसांना ७ दिवसांचा अल्टिमेटम )

या लोकल रद्द

  • चर्चगेट-अंधेरी – रात्री 12.31
  • चर्चगेट-बोरिवली-रात्री 1.00
  • चर्चगेट-बोरिवली- रात्री 12.41
  • अंधेरी -चर्चगेट-पहाटे-4.04
  • बोरिवली-चर्चगेट-पहाटे 3.50
  • बोरिवली-चर्चगेट- पहाटे 5.31

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.