मध्य रेल्वेच्या कल्याण ते विठ्ठलवाडी दरम्यान रोड ओव्हर ब्रिज गर्डर टाकण्यासाठी विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक असणार आहे. 26 आणि 27 नोव्हेंबर 2022 रोजी (शनिवार/रविवार रात्री) सकाळी 02.05 ते 03.35 पर्यंत कल्याण आणि विठ्ठलवाडी दरम्यान मार्गावर ब्लॉक असणार आहे.
( हेही वाचा : Sunday Megablock : रविवारी प्रवाशांची होणार गैरसोय; पहा मेगाब्लॉकचे संपूर्ण वेळापत्रक!)
कल्याण ते विठ्ठलवाडी दरम्यान मेगाब्लॉक
- कर्जतहून पहाटे 02.33 वाजता सुटणारी अप लोकल 7 मिनिटे उशिराने म्हणजे पहाटे 02.40 वाजता सुटेल आणि अंबरनाथ स्थानकावर नियोजित वेळेच्या 25 मिनिटे उशिरा पोहोचेल.
- सीएसएमटीहून 00.28 वाजता सुटणारी ठाणे लोकल आणि ठाण्याहून 04.48 वाजता सुटणारी सीएसएमटी लोकल 27 नोव्हेंबर 2022 रोजी रद्द करण्यात आली आहे.
एक्स्प्रेस ट्रेनचे वेळापत्रक
ट्रेन क्रमांक 11020 भुवनेश्वर-मुंबई कोणार्क एक्स्प्रेस अंबरनाथ येथे 60 मिनिटांसाठी नियमित केली जाईल आणि दादर येथे शॉर्ट टर्मिनेट केली जाईल आणि ट्रेन क्रमांक 18519 विशाखापट्टणम- LTT एक्स्प्रेस बदलापूर येथे 15 मिनिटांसाठी नियमित केली जाईल आणि गंतव्यस्थानावर 20 ते 25 मिनिटे उशिरा पोहोचेल.
Join Our WhatsApp Community