प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेच्या ‘या’ स्थानकांदरम्यान विशेष पॉवर ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच प्रवास करा…

मध्य रेल्वेच्या कल्याण ते विठ्ठलवाडी दरम्यान रोड ओव्हर ब्रिज गर्डर टाकण्यासाठी विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक असणार आहे. 26 आणि 27 नोव्हेंबर 2022 रोजी (शनिवार/रविवार रात्री) सकाळी 02.05 ते 03.35 पर्यंत कल्याण आणि विठ्ठलवाडी दरम्यान मार्गावर ब्लॉक असणार आहे.

( हेही वाचा : Sunday Megablock : रविवारी प्रवाशांची होणार गैरसोय; पहा मेगाब्लॉकचे संपूर्ण वेळापत्रक!)

कल्याण ते विठ्ठलवाडी दरम्यान मेगाब्लॉक

  • कर्जतहून पहाटे 02.33 वाजता सुटणारी अप लोकल 7 मिनिटे उशिराने म्हणजे पहाटे 02.40 वाजता सुटेल आणि अंबरनाथ स्थानकावर नियोजित वेळेच्या 25 मिनिटे उशिरा पोहोचेल.
  • सीएसएमटीहून 00.28 वाजता सुटणारी ठाणे लोकल आणि ठाण्याहून 04.48 वाजता सुटणारी सीएसएमटी लोकल 27 नोव्हेंबर 2022 रोजी रद्द करण्यात आली आहे.

एक्स्प्रेस ट्रेनचे वेळापत्रक

ट्रेन क्रमांक 11020 भुवनेश्वर-मुंबई कोणार्क एक्स्प्रेस अंबरनाथ येथे 60 मिनिटांसाठी नियमित केली जाईल आणि दादर येथे शॉर्ट टर्मिनेट केली जाईल आणि ट्रेन क्रमांक 18519 विशाखापट्टणम- LTT एक्स्प्रेस बदलापूर येथे 15 मिनिटांसाठी नियमित केली जाईल आणि गंतव्यस्थानावर 20 ते 25 मिनिटे उशिरा पोहोचेल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here