१६ डिसेंबरला मध्य रेल्वेच्या ‘या’ स्थानकादरम्यान विशेष पॉवर ब्लॉक

156

मध्य रेल्वे मार्गावर कर्जत स्थानकावर 4 क्रमांकाचे पोर्टल उभारण्यासाठी शुक्रवार दिनांक १६ डिसेंबर २०२२ रोजी विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक असणार आहे.

( हेही वाचा : मंत्रिमंडळ विस्ताराला अमित शहांकडून हिरवा कंदील; शिंदे-फडणवीसांना दिले सर्वाधिकार )

कर्जत स्थानकादरम्यान असणाऱ्या विशेष पॉवर ब्लॉकचा तपशील खालीलप्रमाणे आहे…

दिनांक 16 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 10.45 ते दुपारी 12.00 वाजेपर्यंत घाट विभागातील तिन्ही मार्गांवर कर्जतपर्यंत ब्लॉक असणार आहे.

उपनगरीय गाड्यांची धावण्याची स्थिती

कर्जतहून सकाळी 10.40 वाजता सुटणारी SKP-5 खोपोली लोकल आणि 11.20 वाजता खोपोलीहून सुटणारी SKP 10 कर्जत लोकल रद्द करण्यात आली आहे.

ट्रेन क्रमांक 22731 हैदराबाद-मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेस आणि ट्रेन क्रमांक 11014 कोईम्बतूर-एलटीटी एक्स्प्रेस लोणावळा येथे नियमित केली जाईल आणि निर्धारित वेळेच्या 20-65 मिनिटे उशिरा पोहोचेल.

या पायाभूत सुविधांच्या ब्लॉकमुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे, तसेच प्रवाशांनी वेळापत्रक पाहून प्रवास करावा असे आवाहन रेल्वे मार्फत करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.