अमरावती जिल्ह्यातील कॉलराच्या साथीने धुमाकूळ घातलेला असताना विहिरीतील पाण्यातून कॉलराचे जंतू रुग्णांच्या शरीरात गेल्याचे सिद्ध झाले आहे. अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा आणि अमरावती तालुक्यात वीजेचा पुरवठा खंडीत झाल्याने पाणी पंपाने नागरी वसाहतीत पाणीपुरवठा केला गेला नाही. परिणामी, स्थानिकांनी विहिरीतील पाणी प्यायला सुरुवात केल्याने कॉलराची साथ पसरल्याचे आरोग्य विभागाच्या पाहणीतून समोर आले. येत्या पंधरा दिवसांत अमरावतीतील कॉलराची साथ आटोक्यात आणण्यासाठी ग्रामीण विकास विभाग, पाणी पुरवठा विभाग, आरोग्य विभागाने एकत्र येत प्रतिबंधात्मक उपाययोजना त्वरित अंमलात आणण्याचा सर्वमताने निर्णय घेतला आहे.
( हेही वाचा : बेरोजगारांना सरकारी नोकरीची मोठी संधी! मिळेल भरगच्च पगार, या ठिकाणी करा अर्ज! )
आरोग्य विभागाने नियुक्त केलेल्या वैद्यकीय पथकाने प्रत्येक घरातील लोकांच्या विष्ठेची तसेच घरातील पिण्यायोग्य आणि घरगुती कामकाजांसाठी वापरल्या जाणा-या पाण्याचे नमुने तपासण्यास सुरुवात केली आहे. लोकांना जुलाबाची लक्षणे दिसून आढळल्यास तातडीने उपचार करण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत. घरातील सदस्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब आदी त्रास असल्यास या रुग्णांकडे विशेष लक्ष देणे तसेच अतिसाराच्या रुग्णांकडे प्राधान्याने लक्ष द्या, अशा सूचनाही आरोग्य विभागाने दिल्या आहेत. अतिसाराच्या सौम्य तसेच मध्यम स्वरुपाच्या रुग्णांकडे दुर्लक्ष करु नका, असेही सक्तीचे आदेश वैद्यकीय पथकाला आरोग्य विभागाने दिले आहेत.
अमरावतीत कुठे आहे कॉलराची साथ –
अमरावती तालुक्यात नया अकोला तर चिखलदरा तालुक्यात पाचडोंगरी, कोयलारी आणि घाना या तीन गावांमध्ये कॉलराची साथ पसरली आहे.
Join Our WhatsApp Community