Mulund Sports Complex : मुलुंड स्पोर्टस कॉम्प्लेक्स मध्ये विजेचा खेळखंडोबा

दरम्यान महापालिकेने या जुन्या विद्युत तारांमुळे विद्युत पुरवठ्यात बिघाड होत असल्याने या संपूर्ण संकुलातील विद्युत प्रणालीच बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

1597
Mulund Sports Complex : मुलुंड स्पोर्टस कॉम्प्लेक्स मध्ये विजेचा खेळखंडोबा
Mulund Sports Complex : मुलुंड स्पोर्टस कॉम्प्लेक्स मध्ये विजेचा खेळखंडोबा

मुंबई महापालिकेच्या मुलुंड (Mulund) येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रिडा संकुलात विजेचा खेळखंडोबा सुरु असून येथील विद्युत पुरवठा तसेच विद्युत तारा या जुन्या झाल्याने वारंवार विज पुरवठा खंडित होत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहे. दरम्यान महापालिकेने या जुन्या विद्युत तारांमुळे विद्युत पुरवठ्यात बिघाड होत असल्याने या संपूर्ण संकुलातील विद्युत प्रणालीच बदलण्याचा निर्णय घेतला आहे. (Mulund Sports Complex)

मुलुंड (Mulund) परिसरात १९८२मध्ये महापालिकेचे प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रिडा संकुलचे निर्माण करण्यात आले आहे. याठिकाणी महाकवी कालिदास नाट्य मंदिर, जलतरण तलाव, क्रिडा संकुल, लग्न हॉल, मैदान आदींचा समावेश आहे. मात्र, यासर्व ठिकाणी मागील काही दिवसांपासून विजेचा पुरवठा वारंवार खंडित होत असतो. (Mulund Sports Complex)

विद्युत प्रणाली ही ३० वर्षे जुनी

महापालिका अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या सर्व सुविधांना पुरवण्यात येणारा विद्युत पुरवठा तसेच हायटेन्शन इन्कमर, ट्रान्सफॉर्मर, विद्युत कक्ष, विद्युत तारा आणि स्विचगियर्स हे ३० वर्ष जुने आहेत. क्रिडा संकुलात पुरविल्या जाणाऱ्या सुविधांमध्ये वाढ झालेली आहे. त्यामुळे सद्यस्थितीतील कार्यरत असलेली विद्युत प्रणाली अपूरी पडत आहे. तत्कालीन डिझाईन केलेली विद्युत प्रणाली ही ३० वर्षे जुनी असल्याने तिचे उपयुक्त आयुष्य संपले आहे. (Mulund Sports Complex)

(हेही वाचा – Ashish Shelar : भ्रष्टाचारमुक्त भारताची ‘मोदी की गॅरंटी’- आशिष शेलार)

इलेक्ट्रिक केबल्स आणि तारांमुळे ओव्हरलोड

त्यामुळे विद्युत प्रवाहाच्या वाढत्या मागणीला तोंड देण्यात ही विद्युत प्रणाली कमी पडत आहे. कमी क्षमतेच्या इलेक्ट्रिक केबल्स आणि तारांमुळे ओव्हरलोड आणि हीटिंगच्या समस्या वारंवार येतात. ट्रान्सफॉर्मरने त्याची कमाल वापरण्यायोग्य क्षमता गाठलेली असल्या कारणाने लोड मागणीमध्ये आणखी वाढ झाल्यास संपूर्ण विद्युत पुरवठा बंद होऊ शकतो. तसेच, लाईट फीटिंग आणि यांत्रिकी जोडण्या बिघडलेल्या अवस्थेत असल्यामुळे क्रिडा संकुल सदस्यांची आणि नाटयमंदिराला भेट देणाऱ्या सर्वसामान्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. (Mulund Sports Complex)

तब्बल २० काटी रुपयांचा खर्च

त्यामुळेच प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रिडा संकुल येथे इतर कामांसह संपूर्ण विद्युत प्रणालीला सुधारीत करणे अत्यंत आवश्यक असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे मुलुंडमधील (Mulund) प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रिडा संकुल येथे यांत्रिकी व विद्युत प्रणालीला सुधारीत करण्यासाठी निविदा मागवण्यात आली आहे. यासाठी तब्बल २० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. यासाठी चैत्रा इलेक्ट्रिकल अॅड इंजीनियरिंग कंपनीची निवड करण्यात आली आहे. (Mulund Sports Complex)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.