- ऋजुता लुकतुके
भारतात अजूनही निवृत्तीनंतरची आर्थिक तरतूद आणि एकूणच सुरक्षित गुंतवणुकीच्या दृष्टीने भविष्य निर्वाह निधी किंवा पब्लिक प्रॉव्हिडंड फंडात गुंतवणूक करण्याकडे लोकांचा कल असतो. पण, आता पीपीएफ खात्याविषयीचे काही नियम येत्या १ ऑक्टोबरपासून बदलणार आहेत. अर्थ मंत्रालयाने पोस्ट ऑफिसमध्ये उघडलेली पीपीएफ खाती, अनिवासी भारतीयांची पीपीएफ खाती आणि एकापेक्षा जास्त पीपीएफ खाती असलेल्या खातेधारकांसाठी नियमांत काही बदल केले आहेत. तशी सुधारित मार्गदर्शक तत्त्वं अलीकडेच अर्थ मंत्रालयाने प्रसिद्ध केली आहेत. (PPF Account New Rules)
पीपीएफ नियमांमधील नवे बदल हे अल्पवयीन मुलांच्या नावाने उघडलेले खाते, एकापेक्षा जास्त पीपीएफ खाती असतील तर आणि पोस्ट ऑफिसमधून राष्ट्रीय बचत योजनांतर्गत अनिवासी भारतीयांच्या पीपीएफ खात्यांच्या विस्ताराशी संबंधित आहेत. अल्पवयीन मुलांच्या नावाने उघडलेल्या पीपीएफ खात्यांच्या सुधारित नियमांनुसार, अल्पवयीन व्यक्तीला १८ वर्षे वयापर्यंत या खात्यांवर पोस्ट ऑफिस बचत खात्यावर लागू होणारे व्याजच मिळत राहील. अशा खात्यांचा परिपक्वता कालावधी अल्पवयीन व्यक्ती प्रौढ झाल्याच्या तारखेपासून मोजला जाईल. म्हणजेच, ज्या तारखेपासून व्यक्ती खाते उघडण्यास पात्र होते. (१८ वर्ष पूर्ण झालेली व्यक्ती)
(हेही वाचा – Kolkata Doctor Rape and Murder Case : पोलिसांनी कागदपत्रे चुकीच्या पद्धतीने तयार केल्याचे सीबीआयचा आरोप)
एकापेक्षा जास्त पीपीएफ खाती असतली तर, कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा एजन्सी बँकेतील गुंतवणूकदाराच्या प्राथमिक खात्यावर योजनेच्या दरानुसार व्याज दिले जाईल. मात्र, ठेवीची रक्कम वार्षिक कमाल मर्यादेपेक्षा जास्त नसावी, अशी अट आहे. दुसऱ्या खात्यात शिल्लक असल्यास, एकूण रक्कम वार्षिक गुंतवणुकीच्या मर्यादेत राहिली तर ती प्राथमिक खात्याशी जोडली जाईल. दोन्ही खाती लिंक केल्यानंतर, विद्यमान योजनेचा व्याजदर प्राथमिक खात्यावर लागू राहील. दुसऱ्या खात्यातील कोणत्याही अतिरिक्त निधीची शून्य टक्के व्याज दराने परतफेड केली जाईल.
प्राथमिक आणि दुय्यम खात्याशिवाय इतर कोणत्याही अतिरिक्त खात्यावर खाते उघडण्याच्या तारखेपासून शून्य व्याजदर मिळेल. १९६८ च्या सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजनेंतर्गत उघडलेल्या सक्रिय पीपीएफ खाती असलेल्या अनिवासी भारतीयांसाठी, फॉर्म एचमध्ये खातेधारकाच्या निवासी स्थितीबद्दल माहिती दिलेली नसेल तर अशा खात्यांवर शून्य टक्के दराने व्याज मिळेल. त्यामुळे या खात्यांवर लागू होणारे व्याज दर पोस्ट ऑफिस योजनेतील मार्गदर्शक तत्त्वांनुसार ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत कायम राहतील. यानंतर खात्यावर शून्य टक्के दराने व्याज मिळू लागेल. (PPF Account New Rules)
(हेही वाचा – Israel Lebanon Hezbollah War : लेबनॉनमध्ये ७०० लोकांचा मृत्यू; भारतीयांसाठी नवी अधिसूचना जारी)
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी हे केंद्र सरकारतर्फे सुरू करण्यात आलेलं एक लोकप्रिय आर्थिक साधन आहे. लोकांना गुंतवणुकीची सवय लागावी आणि सुरक्षित गुंतवणुकीतून लोकांना चांगला परतावा मिळावा यासाठी सरकारने ही योजना सुरू केली. हे साधन ईईई या तत्वांवर काम करते. म्हणजेच या योजनेत गुंतवलेली मुद्दल, मिळालेलं व्याय आणि मुदतीनंतर मिळणारी रक्कम अशा तीनही ठेवींवर आयकर लागत नाही.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community