PPF Scheme : पीपीएफ योजनेत होणार ‘हे’ ३ बदल

PPF Scheme : १ ऑक्टोबरपासून पीपीएफ योजनेत महत्त्वाचे बदल होणार आहेत.

1473
PPF Scheme : पीपीएफ योजनेत होणार ‘हे’ ३ बदल
  • ऋजुता लुकतुके

भविष्य निर्वाह निधी योजनेवर गुंतवणूकदारांचा विश्वास आहे. सरकारी योजना आणि सरकारकडून इतर योजनांच्या तुलनेत मिळणारं थोडं जास्त व्याज यामुळे सर्वात सुरक्षित आणि किफायतशीर योजना असं पीपीएफला म्हटलं जातं. या योजनेत आता १ ऑक्टोबरपासून ३ महत्त्वाचे बदल होणार आहेत आणि ते ग्राहकांच्या हिताचेच आहेत. हे बदल आणि त्यांचा आपल्यावर होणारा परिणाम जाणून घेऊया

पोस्ट ऑफिसच्या स्मॉल सेव्हिंग स्कीम्स अंतर्गत चालवली जाणारी पब्लिक प्रोविडेंड फंड या योजनेबाबत अर्थ मंत्रालयाकडून एक मार्गदर्शक सूचना जारी केली जाणार आहे. ही एक अशी योजना आहे, जी १५ वर्षांच्या मॅच्युरिटी कालावधीसह येते आणि दीर्घ मुदतीत तुम्हाला कोट्यधीश बनवू शकते. जाणून घेऊया या योजनेत कोणते बदल होणार आहेत? (PPF Scheme)

(हेही वाचा – Malvan Shivaji Maharaj Statue : पुतळ्यांची उंची किती असावी ?; राज्याचे सांस्कृतिक धोरण जाहीर होणार)

२१ ऑगस्ट २०२४ रोजी केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत आर्थिक व्यवहार विभागानं नव्या नियमांबाबत मार्गदर्शक तत्वं जारी केली आहेत, ज्या अंतर्गत पीपीएफचे तीन नवे नियम लागू केले जातील. याशिवाय सुकन्या समृद्धी योजना आणि एनएससीच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत. मार्गदर्शक तत्त्वांमध्ये, अल्पवयीन ते अनिवासी भारतीयांपर्यंत तीन वेगवेगळ्या प्रकरणांच्या अनियमित खात्यांचे नियमितीकरण तपशीलवार स्पष्ट केले आहेत.

एखादी व्यक्ती जर अल्पवयीन असेल, तरीदेखील त्यांच्या नावानं पोस्ट ऑफिसच्या पीपीएफ योजनेसाठी खातं उघडता येणार आहे. म्हणजेच, खातं उघडल्यानंतर PPF व्याज व्यक्ती १८ वर्षांची होईपर्यंत दिलं जाईल. ज्या तारखेला अल्पवयीन व्यक्ती प्रौढ होईल, त्या तारखेपासून मॅच्युरिटी कालावधी मोजला जाईल. म्हणजेच, ज्या तारखेपासून व्यक्ती खातं उघडण्यास पात्र होते, त्या दिवसापासून मॅच्युरिटीचा कालावधी गणला जाणार. (PPF Scheme)

(हेही वाचा – Ind vs Ban Test Series : भारतीय संघात ‘या’ दोन युवा तेज गोलंदाजांना संधी)

जर जमा केलेली रक्कम प्रत्येक वर्षासाठी लागू असलेल्या कमाल मर्यादेत असेल, तर प्रायमरी अकाउंटवर योजनेनुसार, व्याज आकारलं जाईल. जर प्राथमिक खातं दरवर्षी अंदाजे गुंतवणूक मर्यादेत राहीलं, तर दुसऱ्या खात्यातील शिल्लक पहिल्या खात्यात विलीन केली जाईल. विलीनीकरणानंतर, प्रायमरी अकाउंट वर प्रचलित योजना दर किंवा व्याज दर मिळत राहणार. विलीनीकरणानंतर, प्रायमरी अकाउंटवर प्रचलित योजना दर किंवा व्याज खात्यावर मिळत राहणार. प्राथमिक आणि दुय्यम खात्यांव्यतिरिक्त इतर कोणत्याही अतिरिक्त खात्यावर खातं उघडण्याच्या तारखेपासून शून्य टक्के व्याजदर मिळेल. याचा अर्थ एकापेक्षा जास्त खाती उघडली तरी पीपीएफ योजनेंतर्गत व्याज एकाच खात्यावर मिळेल.

PPF, १९६८ अंतर्गत फक्त सक्रिय NRI PPF खाती उघडली जातात, जिथे खातेदाराची निवासी स्थिती फॉर्म H मध्ये विशेषतः विचारली जात नाही. अकाउंट होल्डर्स (भारतीय नागरिक जे खाते उघडण्याच्या कालावधीत NRI झाले आहेत) यांना पीओएसए दरानं ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत व्याज दिलं जाईल. यानंतर १ ऑक्टोबरपासून या खात्यांवर शून्य व्याजदर लागू होईल. (PPF Scheme)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.