माजी नगरसेवक Prabhakar Shinde यांचा बेस्टला इशारा; अपघाताच्या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला, तर…

318
माजी नगरसेवक Prabhakar Shinde यांचा बेस्टला इशारा; अपघाताच्या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला, तर...
माजी नगरसेवक Prabhakar Shinde यांचा बेस्टला इशारा; अपघाताच्या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला, तर...

बेस्ट बसच्या दि. ९ डिसेंबर रोजीच्या अपघातानंतर बेस्ट प्रशासनावर आणि चालकावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. त्यातच माजी नगरसेवक प्रभाकर शिंदे (Prabhakar Shinde ) यांनी बेस्ट प्रशासनाला पत्र लिहले आहे. त्या पत्रात शिंदे म्हणाले की, बेस्ट बसच्या (BEST BUS) अपघात प्रकरणाची सखोल चौकशी करून या घटनांसंदर्भात जबाबदार कंत्राटदारावर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. केवळ एका वाहन चालकावर कारवाई करून या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न जर कोणी करत असेल तर भाजपा ते सहन करणार नाही, असा इशारा ही शिंदे यांनी बेस्ट प्रशासनाला दिला.

( हेही वाचा : Marakadwadi मध्ये अराजक माजवण्याचा कट; जॉर्ज सोरोसचे नवे टूलकिट; डॉ. उदय निरगुडकरांचा घणाघात

शिंदे (Prabhakar Shinde ) पत्रात लिहतात की, दि. ९ डिसेंबरच्या कुर्ला येथे झालेल्या बेस्ट बसच्या भीषण अपघाताबाबत आम्ही आपले लक्ष वेधू इच्छितो. या अपघातात रस्त्यावरून जाणाऱ्या चार नागरिकांचा नाहक बळी गेला असून तो आकडा वाढण्याची शक्यता आहे. ३५ हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. बेस्ट बसचा (BEST BUS) असा अपघात अत्यंत दुर्देवी आहे आणि बेस्ट प्रशासनाला, लोकप्रतिनिधींना अंतर्मुख करून विचार करायला लावणार आहे असे वाटते, असे नगरसेवक शिंदे म्हणाले.

तसेच आजमितीस बेस्ट ताफ्यातील ३ हजार बेस्ट बसेसपैकी (BEST BUS) २ हजार बसेस (BEST BUS) या भाडेकरार तत्त्वावर वेट लिजवर चालविण्यात येतात. या भाडेकरार तत्त्वावर बसचा पुरवठा करणारा कंत्राटदारच या बससाठी चालक आणि वाहक यांची व्यवस्था करतो. बऱ्याच वेळा असे लक्षात आले आहे की, कंत्राट दराने नेमलेले बस चालक हे नवीन असतात. आणि त्यामुळे त्यांना मुंबईच्या (Mumbai) रस्त्यावर वर्दळीच्या ठिकाणी बसेस चालवताना अडचण येते.त्यातूनच अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे. गेल्या वर्षभरात सुमारे आठ नागरिकांनी बेस्टच्या अपघातात जीव गमवाला आहे हे बाब अत्यंत गंभीर आहे, असे ही प्रभाकर शिंदे (Prabhakar Shinde ) यांनी बेस्ट प्रशासनाला सांगितले.

तसेच बेस्ट अपघातात बेस्ट (BEST BUS) चालक व कंत्राटदार यांच्या चुकीमुळे ज्यांचे नाहक बळी गेलेत अशा मृत नागरिकांच्या नातेवाईकांना आपण तातडीने दहा लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी आणि जखमी नागरिकांवरील उपचाराची संपूर्ण जबाबदारी व खर्च बेस्ट प्रशासनाने उचलावा. तसेच जखमी नागरिकांना रुपये ५० हजार ते दोन लाख पर्यंत झालेल्या जखमेच्या प्रमाणात तातडीने मदत देण्यात यावी, अशी मागणी शिंदे(Prabhakar Shinde ) यांनी बेस्ट प्रशासनाकडे केली.

बेस्ट मध्ये भाडे करार तत्त्वावर बसेस घेण्याचे कंत्राट वर्ष २०१८ ते २०२१ या काळात तत्कालीन सत्ताधारी उबाठा (UBT) सेनेच्या नेतृत्वात आणि उबाठा सेनेचे युवराज आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार देण्यात आले होते. त्यावेळी भाजपाने या पस्तावाबाबत प्रश्न उपस्थित केले होते. आता वाढणाऱ्या अपघातामुळे आणि झालेल्या जीवितहानीमुळे सदर बाबीचा पुनर्विचार करण्याची आवश्यकता आहे, असे ही माजी नगरसेवक शिंदे (Prabhakar Shinde ) यांनी बेस्ट महाव्यवस्थापकच्या निदर्शनात आणून दिले.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.