बोरीवलीतील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहाची (Prabodhankar Thackeray Theater) अंतर्गत भागातच दुरवस्था झालेली असून नाट्यगृहातील खुर्च्या तसेच छताला गळती लागल्याने छत आणि भिंतीचाही भागही खराब झाल्याचे वृत्त हिंदुस्थान पोस्टने प्रसिध्द केल्यानंतर अखेर या नाट्यगृहाच्या डागडुजीच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे. महापालिका प्रशासनाने या कामांसाठी कंत्राटदाराची नेमणूक केली असून त्यांना कार्यादेशही बजावला आहे. त्यामुळे या कामाला आता प्रत्यक्ष सुरुवात केली जाणार आहे. यासाठी विविध करांसह तब्बल साडे तेरा कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. (Prabodhankar Thackeray Theater)
मराठी नाटकांसह हिंदी आणि गुजराती नाटकांचे प्रमुख ठिकाण असलेल्या प्रबोधनकारांचे नाव दिलेल्या या नाट्यगृहाच्या (Prabodhankar Thackeray Theater) डागडुजीकडे महापालिका प्रशासनाचा पुरता दुर्लक्ष झालेला आहे. या नाट्यगृहाची अंतर्गत दुरवस्था पाहून नाट्य रसिकांमध्ये तीव्र नाराजी आणि भीती व्यक्त केली जात आहे. सुमारे ५९ हजार कोटींचा अर्थसंकल्प असलेल्या महापालिकडे या नाट्यगृहाच्या डागडुजीसाठी पैसे नाहीत की प्रशासनाला यासाठी खर्च करायचे नाहीत असा सवाल नाट्य रसिकांकडून केला जात आहे. याबाबतचे वृत्त हिंदुस्थान पोस्टने प्रकाशित केले होते. मात्र, आता याबाबतची निविदा अंतिम करून पात्र कंत्राटदाराची निवड केली असून याबाबतच्या प्रस्तावाला प्रशासक स्थायी समितीची मान्यता मिळाल्यानंतर कार्यादेशही बजावण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे. महापालिकेच्या इमारत परिरक्षण विभागाच्यावतीने यासाठी मागवलेल्या निविदोमध्ये डी. बी. इन्फ्राटेक कंपनी पा ठरली असून विविध करांसह तब्बल १३ कोटी ६५ लाखांचा खर्च यावर केला जाणार आहे. (Prabodhankar Thackeray Theater)
(हेही वाचा – Prabodhankar Thackeray Theater ची दुरवस्था; तुटलेल्या, फाटलेल्या खुर्च्या, भिंती झाल्या खराब)
कोणत्या स्वरुपातील कामे केली जाणार
- मुख्य व लघु प्रेक्षक गृहातील खुर्च्या बदलणे.
- मुख्य व लघु प्रेक्षकगृहात नवीन गालिचे बसविणे.
- मुख्य व लघु प्रेक्षकगृहातील खुर्च्यांकरता काँक्रीटीकरण करणे.
- इमारतीच्या ए, बी, आणि सी विंगच्या दर्शनी भागातील जुनी काचेची तावदाने काढून नवीन काचेची तावदाने बसविणे.
- प्रसाधनगृह, उपहारगृह व पोडीयम येथील पाणी गळती प्रतिबंधक काँक्रिटची कामे करणे.
- आवश्यकतेनुसार अंतर्गत व बाह्य सिमेंट गिलाव्याची कामे.
- समाजमंदिर सभागृह, बहुउद्देशीय सभागृह, मेकअप खोल्या, सराव खोल्या, बी विंग मधील कर्मचारी निवासस्थाने, पॅसेज येथील लाद्या बसविणे.
- मेकअप खोल्या, सराव खोल्या तसेच प्रसाधनगृहात भिंतीला लाद्या लावणे.
- ए विंगमधील उपहारगृह येथे छप्पर बसविणे.
- प्रदर्शन सभागृह, समाजमंदिर सभागृह, मेकअप खोल्या, सराव खोल्या, प्रसाधनगृहाचा काही भाग येथे फॉल्स सिलिंग बसविणे.
- वाळवीविरोधी उपाययोजना करणे.
- जिन्यामधील भिंतीला आधाररूळ बसविणे.
- आवश्यकतेनुसार अॅल्युमिनियम खिडक्यांची कामे.
- आवश्यकतेनुसार खिडक्यांना संरक्षक जाळी बसविणे.
- आवश्यकतेनुसार प्रदर्शन सभागृह, दुसऱ्या मजल्यावरील उत्तरेकडील सज्जाचा भाग, समाजमंदिर सभागृह, बहुउद्देशीय सभागृह येथील भिंतीना विनियर पॅनेलींग करणे.
- अॅल्युमिनियम प्रोफाईल बेस नामफलक बसविणे.
- अंतर्गत व बाह्य रंगकामे.
- छत कामे व नळ कामे.
- विद्युत कामे. (Prabodhankar Thackeray Theater)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community