प्रधानमंत्री आवास योजना आणि राज्य आवास योजनेतील लाभार्थ्यांची अपूर्ण राहिलेली घरकुल पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजनेची घरे 31 मार्च पूर्वी पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
( हेही वाचा : दौंड हादरले! आत्महत्या की घातपात? भीमा नदीत आढळले एकाच कुटुंबातील ७ जणांचे मृतदेह)
प्रधानमंत्री आवास योजनेच्या ग्रामीण योजनेंतर्गत बुलढाणा जिल्ह्यात 44 हजार 705 घरकुले मंजूर करण्यात आली आहेत. यापैकी 22 हजार 125 घरकुले पुर्ण झाली आहेत. यातील 22 हजार 523 घरकुले अपूर्ण आहेत. या अपुर्ण घरकुलांपैकी 7 हजार 346 लाभार्थी भूमिहीन लाभार्थी वगळता अपूर्ण घरकुलांची संख्या 15 हजार 224 एवढी आहे. यात बुलढाणा 1 हजार 310, चिखली 1 हजार 612, देऊळगावराजा 511, जळगाव जामोद 873, खामगाव 1 हजार 441, लोणार 1 हजार 507,मलाकापूर 671, मेहकर 1 हजार 594, मोताळा 808, नांदुरा 860, संग्रामपूर 2 हजार 532, शेगाव 447, सिंदखेडराजा 1 हजार 58 घरकुले अपूर्ण आहेत.
रमाई आवास योजनेच्या ग्रामीण अंतर्गत जिल्ह्यात 18 हजार 302 घरकुले मंजूर आहेत. यापैकी 10 हजार 581 घरकुले पुर्ण आहेत. यातील 7 हजार 721 घरकुले अपूर्ण आहेत. अपूर्ण घरकुलांची संख्या 7 हजार 721 आहे. यात बुलढाणा 313, चिखली 661, देऊळगावराजा 245, जळगाव जामोद 456, खामगाव 1 हजार 37, लोणार 475, मलकापूर 301, मेहकर 481, मोताळा 1 हजार 686 नांदुरा 737, संग्रामपूर 290, शेगाव 448, सिंदखेडराजा 591 घरकुल अपुर्ण आहेत. ही घरकुले 31 मार्च 2023 पर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याबाबत आदेश देण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community