Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana (PMGKAY) : गरिबांना मोफत अन्नधान्य देणाऱ्या योजनेला ५ वर्षं मुदतवाढ

केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची मुदत ५ वर्षांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ८१ कोटी लोकांना महिन्याला ५ किलो रेशन या योजनेत मोफत मिळतं.

210
Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana (PMGKAY) : गरिबांना मोफत अन्नधान्य देणाऱ्या योजनेला ५ वर्षं मुदतवाढ
Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana (PMGKAY) : गरिबांना मोफत अन्नधान्य देणाऱ्या योजनेला ५ वर्षं मुदतवाढ
  • ऋजुता लुकतुके

केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची मुदत ५ वर्षांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ८१ कोटी लोकांना महिन्याला ५ किलो रेशन या योजनेत मोफत मिळतं. (PMGKAY)

पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेला डिसेंबर २०२८ पर्यंत मुदतवाढ देण्याचा महत्त्वाचा निर्णय बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या योजनेमुळे दारिद्रय रेषेखालील सुमारे ८१ कोटी लोकांना रेशनच्या दुकानांमध्ये महिन्याला ५ किलोचा शिधा मोफत देण्यात येतो. (PMGKAY)

या महिन्याच्या सुरुवातीलाच छत्तीसगडमध्ये निवडणूक प्रचारसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुदतवाढीचं सुतोवाच केलं होतं. या मुदतवाढीमुळे सरकारच्या तिजोरीवर ११.८ लाख कोटी रुपयांचा ताण पडणार आहे. (PMGKAY)

कोव्हिड १९ उद्रेकादरम्यान गरीब लोकांना मदत म्हणून एप्रिल २०२० मध्ये ही योजना सर्वप्रथम लागू करण्यात आली होती. तेव्हा योजनेची मुदत तीन महिने इतकी होती. नंतर ती वाढवण्यात आली. (PMGKAY)

(हेही वाचा – Parliament Winter Session : हिवाळी अधिवेशनात खासदारांना देण्यात येणार वेद ग्रंथ)

२०२३ च्या अर्थसंकल्प सादरीकरणाच्या वेळी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोफत अन्न योजनेसाठीचा २ लाख कोटी रुपयांचा खर्च केंद्र सरकार करणार असल्याचं जाहीर केलं होतं. पण, तेव्हा योजनेची मुदत डिसेंबर २०२३ पर्यंत होती. आता आगामी अर्थसंकल्पात सरकारला नवीन तरतूद करावी लागणार आहे. (PMGKAY)

पण, ८१ कोटींच्या वर गरीब जनतेसाठी हा मोठा दिलासा आहे. कारण, अन्नधान्याच्या किंमती सातत्याने वाढतायत आणि अशावेळी मोफत धान्य हा त्यांच्यासाठी मोठा दिलासा आहे. यावेळी मोफत धान्य योजनेला मुदतवाढ देताना सरकारने अन्नसुरक्षा कायदा आणि अंत्योदय अन्न योजना या दोन योजनाही प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेत जोडल्या आहेत. (PMGKAY)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.