मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी प्रदीप शर्मांची चौकशी! एनआयएच्या कार्यालयात दाखल!

अंबानी प्रकरण आणि मनसुख हिरेन संशयास्पद मृत्यू प्रकरणात प्रदीप शर्मा यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष काय संबंध आहे, याची चाचपणी एनआयए करत आहे.

रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवल्याचे प्रकरण तसेच त्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू या प्रकरणी एनआयएने माजी पोलिस निरीक्षक प्रदीप यांची चौकशी सुरु केली आहे. बुधवार, ७ मार्च रोजी त्यांची एनआयएच्या कार्यालयात चौकशी सुरु आहे. त्याआधी एनआयएने माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचा जबाब नोंदवून घेतला. त्यांनी माजी गृहमंत्री अनिल  यांच्यावर खंडणीखोरीचा आरोप केला आहे. त्यामुळे देशमुख यांना मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.

वाझे आणि शर्मा यांची झालेली भेट!

परमबीर सिंग हे सकाळी ९. ३० वाजताच्या सुमारास एनआयएच्या कार्यालयात दाखल झाले. तिथे त्यांनी जबाब नोंदवला असून ते एनआयएच्या कार्यालयातून निघाले. सिंग यांची अँटलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरण तसेच वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझे याला दिलेल्या विशेष अधिकारांबद्दल चौकशी झाली. त्यानंतर माजी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांची देखील एनआयएकडून चौकशी सुरु झाली. यातून अँटिलियाजवळ उभी करण्यात आलेली स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात शर्मा यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध आहे का, याची चाचपणी एनआयए करत आहे. या घटनांदरम्यान प्रदीप शर्मा आणि सचिन वाझे यांच्यात भेट झाली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

(हेही वाचा : ड्रीम मॉलबाबत कोणी केली हलगर्जी? उच्च न्यायालयातही प्रश्न उपस्थित )

कोण आहेत प्रदीप शर्मा?

प्रदीप शर्मा यांनी शिवसेनेत प्रवेश करून नालासोपारा विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढले. एन्काउंटर स्पेशालिस्ट अशी ओळख असलेले मुंबई पोलीस दलातील माजी अधिकारी प्रदीप शर्मा राजकारणाच्या आखाड्यात उतरले. ते २०१४ मध्ये रिपब्लिकन पक्षात सक्रिय झाले. नंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून  निवडणूक लढली. १९८३ साली पोलीस सेवेत रूजू झालेले प्रदीप शर्मा हे घाटकोपर आणि माहीम ही दोन पोलीस ठाणी वगळता बहुतांश काळ मुंबई गुन्हे शाखा आणि स्पेशल टास्क फोर्समध्येच कार्यरत होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here