मुंबई – पुणे रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! अनुभवता येईल निसर्गाचे विहंगम दृश्य

कोरोना काळात रद्द करण्यात आलेली प्रगती एक्स्प्रेस आता नव्या रंगात व्हिस्टाडोम कोचसह प्रवाशांच्या सेवेत दाखल झालेली आहे. या कोचमुळे प्रवाशांना त्यांच्या प्रवासादरम्यान निसर्गाचे विहंगम दृश्य अनुभवता येणार आहे. मुंबई-पुणे प्रगती एक्स्प्रेसच्या व्हिस्टोडोम कोचमध्ये १८० डिग्री फिरता येईल एवढी आलिशान जागा, मोठ्या काचेच्या खिडक्या, काचेचे छप्पर आणि प्रवाशांच्या माहितीसाठी WiFi सुविधा देण्यात आली आहे.

( हेही वाचा : NCMC System : मुंबईकरांना एकाच तिकिटावर करता येणार बेस्ट, मेट्रो, मोनो, उपनगरीय रेल्वेने प्रवास )

विस्टाडोम कोचसह धावणार

  • प्रगती एक्स्प्रेसमध्ये व्हिस्टाडोम कोच सुरू झाल्यानंतर मध्य रेल्वेकडे आता ४ गाड्या विस्टाडोम कोचसह धावणार आहेत. मुंबई – मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस, मुंबई – पुणे डेक्कन एक्स्प्रेस, मुंबई – पुणे डेक्कन क्वीन आणि आता मुंबई – पुणे प्रगती एक्स्प्रेस या ४ गाड्यांमध्ये व्हिस्टाडोम कोच लावण्यात आले आहेत.
  • 12125 प्रगती एक्सप्रेस ही गाडी एक्सप्रेस २५ जुलै २०२२ पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून दररोज १६.२५ वाजता सुटेल आणि पुणे येथे त्याच दिवशी १९.५० वाजता पोहोचेल.
  • तर २५ जुलैपासून दररोज प्रगती एक्स्प्रेस ०७.५० वाजता पुणे येथून सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे त्याच दिवशी ११.२५ वाजता पोहोचेल.

थांबे : दादर, ठाणे, पनवेल, कर्जत, लोणावळा, शिवाजी नगर

संरचना : एलएचबी कोच: एक विस्टाडोम कोच, एक वातानुकूलित चेअर कार, ११ द्वितीय श्रेणी चेअर कार (५ पूर्णपणे आरक्षित, ४ अनारक्षित, एक मासिक तिकीटधारकांसाठी आणि एक महिला कोच – महिला मासिक तिकीटधारकांसाठी ५४ जागा आणि महिलांसाठी ५४ राखीव जागा) आणि गार्डच्या ब्रेक व्हॅनसह एक सामान्य द्वितीय श्रेणी.

आरक्षण : ट्रेन क्र.12125/12126 साठी बुकिंग दि. २०.७.२०२२ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरु होईल.

या विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here