मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी आता राजकीय मैदानात उतरले पाहिजे. जरांगे पाटलांचा गरीब मराठ्यांच्या रस्त्यावरचा आवाज येणाऱ्या निवडणुकीत लोकसभेतही गेला पाहिजे. जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत भूमिका घेतली पाहिजे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी दिले आहे.
(हेही वाचा – Ayodhya: राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी फटाक्यांची आतिषबाजी होणार, फटाके विक्री स्टॉल्सना परवानगी)
निवडणुकीत राजकीय भूमिका घ्यावी
प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की, गेल्या ३५ वर्षांपासून गरीब मराठ्यांचा लढा हा सुरू आहे. मात्र श्रीमंत मराठे हा लढा उभा राहू देत नव्हते. जरांगे पाटलांच्या निमित्ताने त्याला स्वरूप आणि आकार मिळाला. जरांगे पाटलांनी कुणालाही राजकीय पाठिंबा न देता येणाऱ्या निवडणुकीत राजकीय भूमिका घ्यावी. जरांगे पाटलांच्या पाठीशी गरीब मराठ्यांनी पूर्ण ताकदीने उभे राहिले पाहिजे. मुंबई (Mumbai) येथे जे आंदोलन होणार आहे, तिथे मोठ्या संख्येने उपस्थित राहिले पाहिजे.
(हेही वाचा – Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या पायी मोर्चात मनोज जरांगेंसाठी ‘व्हॅनिटी व्हॅन’; काय काय आहेत सुविधा)
बोलणी अयशस्वी झाल्याची माहिती
राज्य सरकारच्या वतीने मराठा आरक्षणाबाबत आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्याकडून जरांगे पाटलांसोबत सुरू असलेली बोलणी अयशस्वी झाल्याची आमची माहिती आहे. जरांगे पाटील यांच्या माध्यमातून गरीब मराठ्यांचे नेतृत्व उभे राहिले आहे. त्यामुळे श्रीमंत मराठे हादरले आहेत. शासनावरही दबाव टाकला जात असल्याची परिस्थिती आहे. मात्र सरकारकडून जरांगे पाटील यांना खेळवत ठेवलं जात आहे. लोकसभा निवडणुका (Lok Sabha elections) आल्याने सरकारचा हात दगडाखाली आहे, अशा शब्दांत प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर आरोप केले आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community