-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
दादर येथील प्रमोद महाजन कला उद्यानात (Pramod Mahajan Art Park) आवश्यक असलेली कामे लवकरात लवकर पूर्ण केली जातील. स्वच्छतागृह, वीज, पाणी आदी सुविधा अधिक चांगल्या प्रकारे उपलब्ध करुन दिल्या जातील. या उद्यानाला अधिक सुंदर बनविण्यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी या उद्यानातील ’ज्येष्ठ नागरिक समूहा’च्या सदस्यांना दिली.
दादर (पश्चिम) येथील प्रमोद महाजन कला उद्यानाला (Pramod Mahajan Art Park) प्रत्यक्ष भेट देऊन महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी बुधवारी, १९ फेब्रुवारी २०२५ रोजी पाहणी केली. उप आयुक्त (परिमंडळ २) प्रशांत सपकाळे, जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त अजितकुमार आंबी, उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
(हेही वाचा – Aurangzeb याची कबर सुरुंग लावून उडवून देऊ; सुनील पवार यांची घोषणा)
प्रमोद महाजन कला उद्यान (Pramod Mahajan Art Park) हे परिसरातील नागरिकांसाठी विरंगुळ्याचे उत्तम ठिकाण आहे. पावसाळ्यात जास्त पाऊस झाल्यास ते साठविण्यासाठी उद्यानामध्ये भूमिगत टाकीचे बांधकाम करण्यात आले आहे. या टाकीवर सुरक्षेचे सर्व नियम आणि उपाययोजनांचा विचार करुन हिरवळ (लॉन) लागवडीसंदर्भात अभ्यास करावा. उद्यानात पुरेसा प्रकाश राहावा, यासाठी ठिकठिकाणी वीजेच्या दिव्यांची उभारणी करावी. उद्यानात येणाऱ्या नागरिकांसाठी स्वच्छतागृह उपलब्ध करुन द्यावे, अशा सूचना महानगरपालिका आयुक्त गगराणी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
या पाहणी वेळी ज्येष्ठ नागरिक समूहाचे सदस्य उद्यानात (Pramod Mahajan Art Park) उपस्थित होते. त्यांच्याशी ही आयुक्त गगराणी यांनी संवाद साधला. नागरिकांनी उपस्थित केलेल्या विविध विषयांसंदर्भात यथोचित तोडगा काढण्यात येईल, अशी ग्वाही आयुक्तांनी दिली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community