अयोध्येत श्रीराम मंदिराच्या (Shri Ram Mandir) उभारणीचे काम जलद गतीने सुरु आहे. सर्वांना प्रतीक्षा लागली होती ते भगवान श्रीरामाच्या प्राण प्रतिष्ठापनेची. याचा मुहूर्त निश्चित झाला आहे. 22 जानेवारी रोजी मंदिरात श्री रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे.
तीन मजली राम मंदिराच्या (Shri Ram Mandir) तळमजल्याचे बांधकाम डिसेंबरअखेर पूर्ण होईल आणि सोहळा होणार आहे, असे मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी सांगितले. श्रीराम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास जी महाराज यांनी सांगितले की, 15 जानेवारी ते 24 जानेवारी या कालावधीत धार्मिक विधी होणार आहेत. आमच्या वतीने पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहिण्यात आले असून त्याचे उत्तरही मिळाले आहे. आता 22 सप्टेंबर रोजी पंतप्रधान मोदी अयोध्येत येणार असतील तर 22 सप्टेंबर रोजी प्राणप्रतिष्ठा होणार हे निश्चित झाले आहे. या कार्यक्रमासाठी आणखी लोकांना आमंत्रित करण्यात आले आहे.
मंदिराच्या शिखरावर बसवण्यात येणारे उपकरण तयार करण्याचे काम सुरू आहे, ज्याद्वारे प्रत्येक वर्षी रामनवमीच्या दिवशी गर्भगृहातील देवतेच्या कपाळावर सूर्याची किरणे क्षणभर पडतील. ते बेंगळुरूमध्ये बनवले जात आहे आणि त्याची डिझाइन शास्त्रज्ञांच्या देखरेखीखाली होत आहे, असेही नृपेंद्र मिश्रा म्हणाले.
(हेही वाचा Ganeshotsav 2023 : वीर सावरकरांच्या सहभोजन संकल्पनेचे स्मरण करुन देणारा ‘वसईचा राजा’चा उपक्रम )
Join Our WhatsApp Community