अयोध्येतील राम मंदिरात (Ram Temple) भगवान श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याचा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. २२ जानेवारीला मृग नक्षत्राचा योग आहे. हा योग साधून दुपारी १२.२० मिनिटांनी गर्भगृहात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. हा सोहळा सकाळी ११.३६ मिनिटांपासून १२ वाजून २४ मिनिटांपर्यंत साजरा करण्यात येईल. म्हणजे एकंदरीत ४८ मिनिटे ही प्राणप्रतिष्ठा पूजा होणार आहे.
गावातील प्रत्येक मंदिरांमध्ये रामायणाचे पठण
प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी देशात दिवाळी साजरी करण्यात येणार आहे. प्रत्येक घरात दिवे उजळवून दिव्यांची आरास केली जाणार आहे. साधारणत: १० कोटी कुटुंबांना निमंत्रण पत्रिका पाठवण्यात येणार आहे. गावातील प्रत्येक मंदिरांमध्ये रामायणाचे पठण, पूजाअर्चा असे कार्यक्रम होणार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यासोबत असलेल्या संस्थांनी याबाबात योजना आखली आहे.