Prashant Koratkar : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करून इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकावणारा प्रशांत मुरलीधर कोरटकर याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने पोलिसांनी रविवारी ३० एप्रिलला त्याला कनिष्ठ स्तर १२ वे सह दिवाणी न्यायाधीश ए. ए. व्यास (Associate Civil Judge A. A. Vyas) यांच्यासमोर व्हिडिओ कॉलद्वारे हजर केले. त्याच्या जामीन अर्जावर मंगळवारी १ एप्रिलला सुनावणी होणार आहे. दरम्यान, जीविताला धोका असल्याने कोरटकरला कळंबा कारागृहातील स्वतंत्र कोठडीत ठेवण्यात आले आहे. (Prashant Koratkar)
(हेही वाचा – Gudhi Padwa 2025 : स्वातंत्र्यवीर सावरकर समूहाच्या वतीने भगूर येथे उभारली हिंदुत्वाची गुढी)
आरोपी प्रशांत कोरटकर याच्या पोलीस कोठडीची मुदत रविवारी ३० मार्चला संपली असून, या सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे त्याची न्यायालयीन कामकाजासाठी उपस्थिती लावली. पुढील तपासासाठी पोलीस कोठडीची गरज नसल्याने त्याची न्यायालयीन कोठडीत (prashant koratkar judicial custody) रवानगी व्हावी, असे म्हणणे पोलिसांनी मांडले. त्यानुसार न्यायाधीशांनी त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. यानंतर कोरटकरचे वकील सौरभ घाग यांनी ॲड. प्रणील कालेकर यांच्यामार्फत जामीन अर्ज दाखल केला. त्यावर मंगळवारी पोलिसांसह सरकारी वकील आणि बचाव पक्षाच्या वकिलांंनी म्हणणे मांडावे, असे निर्देश न्यायाधीशांनी दिले. यावेळी सरकारी वकील सूर्यकांत पवार, फिर्यादी इंद्रजित सावंत (Indrajeet Sawant) यांच्यासह दिलीप देसाई, हर्षल सुर्वे, आदी शिवप्रेमी उपस्थित होते. सहायक पोलिस निरीक्षक सागर वाघ यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा न्यायालयाच्या आवारात उपस्थित होता. ॲड. घाग, ॲड. असीम सरोदे आणि तपास अधिकारी संजीव झाडे यांनी ऑनलाईन उपस्थिती लावली.
(हेही वाचा – Shubman Gill ठरला पहिला भारतीय खेळाडू ; आयपीएलच्या इतिहासात सर्वात जलद १००० धावा)
स्वतंत्र कोठडीची मागणी
संशयित कोरटकर याच्यावर कारागृहात हल्ला होऊ शकतो. त्यामुळे त्याला कारागृहात स्वतंत्र आणि सुरक्षित कोठडी मिळावी, अशी मागणी ॲड. घाग यांनी केली. या मागणीला न्यायाधीशांनी सहमती दिली.