Prashant Sapkale, Ajitkumar Aambi : प्रशांत सपकाळे यांच्यावर उपायुक्तपदाचा भार, जी -उत्तरच्या सहायक आयुक्त अजितकुमार आंबी

उपायुक्त केशव उबाळे हे सेवा निवृत्त झाल्याने या रिक्त जागी १ मे २०२२ रोजी सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे यांना उपायुक्तपदी बढतीस पात्र ठरले, परंतु त्यांना बढती न मिळाल्याने ते सहायक आयुक्त पदावरच राहिले. तर उपायुक्त (वित्त) रामदास आव्हाड हे सेवानिवृत्त झाल्यानंतर या रिक्त जागी सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांना बढती मिळाली.

1208
Goregaon Film City Road : गोरेगावमधील फिल्मसिटी मार्गावर पुन्हा वाढले फेरीवाले, मे महिन्यात घडला होता तो प्रकार

मुंबई महापालिकेच्या दादर, माहिम आणि धारावी या जी उत्तर प्रशासकीय विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे यांच्यावर अखेर प्रशासनाने उपायुक्तपदाचा भार सोपवत त्यांची नियुक्ती परिमंडळ दोनच्या उपायुक्तपदी केली आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या जी उत्तर विभागाच्या सहायक आयुक्तपदाची जबाबदारी मागील अनेक महिन्यांपासून पदाविना असलेल्या अजितकुमार आंबी (Prashant Sapkale,Ajitkumar Aambi) यांच्यावर सोपवली आहे. अजितकुमार आंबी यांची जी उत्तर विभागाच्या सहायक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर प्रशांत गायकवाड यांना उपायुक्तपदी बढती मिळाल्याने त्यांच्याकडील सहायक आयुक्त (मालमत्ता) विभागाचा अतिरिक्त कार्यभार हा एच पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त विनायक विसपुते यांच्याकडे सोपवला आहे.

(हेही वाचा – Ashok Chavan आज भाजपमध्ये प्रवेश करणार)

मुंबई महापालिकेच्या सामान्य विभागाच्यावतीने सोमवारी १२ फेब्रुवारी २०२४ रोजी सहायक आयुक्तांची पदोन्नती व बदलीबाबतचे आदेश जारी केले आहेत. ज्यामध्ये मागील अनेक महिन्यांपासून उपायुक्तपदी नेमणूक झाल्यानंतरही जी उत्तर विभागाच्या सहायक आयुक्तपदी कायम ठेवलेल्या प्रशांत सपकाळे (Prashant Sapkale,Ajitkumar Aambi) यांच्यावर परिमंडळ दोनच्या उपायुक्तपदी केली. तर परिमंडळ दोनचे उपायुक्त रमाकांत बिरादर हे पुढील दोन महिन्यांनी सेवा निवृत्त होत असून त्यांच्या जागी सपकाळे यांची बदली करताना बिरादर यांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे बिरादर यांना पुढील आदेश निघेपर्यंत बिगर पदाचे राहावे लागणार आहे.

(हेही वाचा – Rajnath Singh : राजनाथ सिंह यांनी केले भारताचे पहिले CDS बिपिन रावत यांच्या पुतळ्याचे अनावरण)

उपायुक्त केशव उबाळे हे सेवा निवृत्त झाल्याने या रिक्त जागी १ मे २०२२ रोजी सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे यांना उपायुक्तपदी बढतीस पात्र ठरले, परंतु त्यांना बढती न मिळाल्याने ते सहायक आयुक्त पदावरच राहिले. तर उपायुक्त (वित्त) रामदास आव्हाड हे सेवानिवृत्त झाल्यानंतर या रिक्त जागी सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांना बढती मिळाली. (Prashant Sapkale,Ajitkumar Aambi) परंतु अनेक दिवस या बढतीचा लाभ न मिळालेल्या सपकाळे हे योग्य विभागाच्या प्रतिक्षेत होते, तर गायकवाड यांची प्रभारी उपायुक्त (वित्त) पदी नेमणूक करून सहायक आयुक्त (मालमत्ता)पदाचा भार त्यांच्याकडे ठेवला होता.

(हेही वाचा – ED Summons Farooq Abdullah : फुटीरतावादी नेते फारुख अब्दुल्ला यांना ईडीचे समन्स)

परंतु आता सपकाळे यांना उपायुक्त (परिमंडळ दोन)पदी नियुक्ती करून त्यांच्या जागी मागील काही महिन्यांपासून पदाविना ठेवून अन्याय होत असलेल्या अजितकुमार आंबी (Prashant Sapkale,Ajitkumar Aambi) यांची वर्णी जी उत्तर विभागाच्या सहायक आयुक्तपदी करण्यात आली आहे. तर गायकवाड यांच्याकडील मालमत्ता विभागाचा भार एच पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त विनायक विसपुते यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार म्हणून सोपवण्यात आला आहे. एच पश्चिम विभागासह मालमत्ता विभागाचा अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडे असेल असे या नियुक्तीच्या आदेशात म्हटले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.