- प्रतिनिधी
भविष्यात एसटीच्या बसस्थानकांचे बांधकाम अधिक सुंदर, आकर्षक आणि पर्यावरणपूरक व्हावे यासाठी महाराष्ट्रातील वास्तुविशारदांनी आपले योगदान द्यावे, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी केले आहे. त्यांनी एसटीच्या मोकळ्या जमिनीवर विकसित होणाऱ्या प्रकल्पांमध्ये शाश्वत विकासाचे “रोल मॉडेल” उभारण्याचे आवाहन केले.
ते “इंडियन असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट” या संघटनेच्या ठाण्यात आयोजित दोन दिवसीय संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. या वेळी राज्यभरातील एसटीच्या जमिनींवर होणाऱ्या प्रकल्पांच्या आराखड्याचे सादरीकरणही करण्यात आले.
(हेही वाचा – Fact Check: भारतीय नागरिकाला जपानमध्ये अल्पवयीन मुलीच्या विनयभंगासाठी अटक? काय आहे ‘त्या’ छायाचित्रामागचे पाकिस्तान कनेक्शन)
एसटीच्या ३ हजार एकर जमिनीचा सर्वसमावेशक विकास :
परिवहन मंत्री सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी सांगितले की, एसटीच्या अंदाजे ३ हजार एकर जमिनीचा विकास करण्यासाठी व्यापक आराखडा तयार केला जात आहे. या आराखड्यामध्ये वास्तुविशारदांनी आपल्या कल्पक सूचनांचा समावेश करावा, यामुळे आराखड्याची गुणवत्ता अधिकाधिक चांगली होईल. भविष्यात एसटीची बसस्थानके आणि आगारे ही वास्तुविशारदांच्या सौंदर्यदृष्टीने विकसित होणार असल्याची त्यांनी ग्वाही दिली.
“एसटीच्या जमिनीवर उभे राहणारे प्रकल्प केवळ सौंदर्यपूर्णच नव्हे, तर प्रेरणादायीही ठरावेत, यासाठी वास्तुविशारदांनी आपल्या कौशल्याचे योगदान द्यावे,” असे मंत्री सरनाईक (Pratap Sarnaik) म्हणाले.
(हेही वाचा – शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत Mahayuti एकमताने ठाम; खोडसाळपणा करणाऱ्यांना राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याकडून चपराक)
उपस्थित मान्यवरांची मनोगते :
या वेळी आमदार संजय केळकर आणि जितेंद्र आव्हाड यांनीही आपली मते व्यक्त केली. या कार्यक्रमाला ऑल इंडिया आर्किटेक्ट असोसिएशनचे अध्यक्ष विलास अवचट, महाराष्ट्र आर्किटेक असोसिएशनचे पदाधिकारी, तसेच विविध आर्किटेक्ट महाविद्यालयांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पर्यावरणपूरक आणि टिकाऊ प्रकल्पांचे महत्त्व :
परिवहन मंत्र्यांच्या या आवाहनामुळे एसटीच्या प्रकल्पांना नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. सुंदर, आकर्षक, पर्यावरणपूरक आणि टिकाऊ बसस्थानके हे येणाऱ्या पिढ्यांसाठी आदर्श ठरतील, असेही मंत्री सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी यावेळी नमूद केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community