पनवेल (Panvel) हे मुंबईच्या वेशीवरील वेगाने विकसित होणारे महानगर आहे. येथे वाढत्या प्रवासी संख्येच्या पार्श्वभूमीवर भव्य बसपोर्ट उभारणे अत्यावश्यक आहे. सन २०१८ पासून रखडलेल्या पनवेल (Panvel) बसपोर्ट प्रकल्पाच्या कामाला तात्काळ गती द्या आणि फेरनिविदा प्रसिद्ध करा, अशा स्पष्ट सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी दिल्या.
( हेही वाचा : कल्याण-डोंबिवलीतील ६५ इमारतींच्या रहिवाशांना बेघर होऊ देणार नाही; आमदार Ravindra Chavan यांची ग्वाही)
विधानभवनात राज्य परिवहन विभागाच्या विविध विषयांवर आयोजित बैठकीत मंत्री सरनाईक बोलत होते. यावेळी आमदार विक्रांत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार विजय देशमुख (Vijay Deshmukh), आमदार दौलत दरोडा (Daulat Daroda), एसटी महामंडळाचे बांधकाम महाव्यवस्थापक दिनेश महाजन (Dinesh Mahajan), मुख्य लेखाधिकारी गिरीश देशमुख उपस्थित होते.
स्थानिक आमदार विक्रांत पाटील (Vikrant Patil ) यांनी पनवेल बसस्थानकाच्या रखडलेल्या कामाबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यावर मंत्री सरनाईक यांनी हे काम तात्काळ सुरू करण्याचे निर्देश दिले. तसेच नांदेड येथील सांगवी येथे नव्या बसस्थानकाच्या कामालाही गती देण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाला देण्यात आल्या. यासंदर्भात आमदार बालाजी कल्याणकर यांनी देखील पाठपुरावा केला.
दरम्यान, शहापूर (Shahapur) येथील नवीन बस पोर्ट, सोलापूरच्या मध्यवर्ती बसस्थानकाचे काम देखील वेगाने पूर्ण करावे आणि पावसाळ्यात प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून तात्पुरत्या शेड्स उभारण्याचे आदेशही मंत्री सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी दिले. वाढते शहरीकरण, शालेय विद्यार्थी आणि नागरिकांच्या सोयीसाठी बस पोर्ट उभारणीला प्राधान्य द्या, अशी मागणी आमदार दौलत दरोडा आणि विजय देशमुख (Vijay Deshmukh) यांनी यावेळी केली.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community