Nagpur violence: नागपूर हिंसाचारातून काय धडा घ्याल?; माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांचा महत्त्वपूर्ण सल्ला
नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराविषयी (Nagpur violence) माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित (Praveen Dixit) यांनी चिंता व्यक्त केली आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन केले आहे. तसेच त्यांनी म्हटले आहे की, सरकार, पोलीस आणि नागरिकांनी यातून धडा घ्यायला हवा.
– फेसबुक, इंस्टाग्रामसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर सध्या हेतूपूर्वक विशिष्ट समुदायाच्या लोकांना भडकवण्यासाठी केला जात असल्याचे दिसत आहे. तसेच यासारख्या घटनांचे प्रमाण वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. अलिकडच्या काळात बंगळुरू आणि दिल्लीतील दंगलींमध्येही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती.
– ट्रॅक्टर, ट्रॉलीसारख्या वाहनात दगड, विटा भरून ओळखीच्या लोकांच्या घरासमोर विशिष्ट दिशेला गाड्या उभ्या करण्यात आल्या. त्यानंतर त्यांनी विशिष्ट समुदायावर हल्ला करून त्यांना लक्ष्य केले.
– हल्लेखोरांनी तुळसी वृंदावन असणाऱ्या घरांवर आणि गणेशमूर्ती असणाऱ्या वाहनांवर हल्ला करत, जाळपोळ केली.
– पोलिस अधिकाऱ्यांवर कुऱ्हाडी, दगड आणि तलवारीने हिंसक हल्ले करण्यात आले.
– हल्लेखोरांच्या गटाकडे जुन्या काळातील तलवारी उपलब्ध होत्या. त्यामुळे अशा हिंसक घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता, पोलीसांनी अशी हत्यारे बाळगणाऱ्यांची वारंवार चौकशी करायला हवी.
काय करायला हवे?
– संशयास्पद व्यक्तींकडून चालवल्या जाणाऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लक्ष ठेवायला हवे. तसेच वेळप्रसंगी त्या समूहाचे सदस्य बनून सतत देखरेख ठेवावी.
– हिंसेची माहिती मिळताच पोलीसांनी विशिष्ट दिशेने जाणाऱ्या वाहनांची आणि संशयास्पद व्यक्तींची चौकशी करून ‘नाकाबंदी’ करणे आवश्यक आहे.
– संवेदनशील ठिकाणी ‘पोलिस मित्र’ (Police Mitra) यांची संख्या वाढवणे. तसेच संशयास्पद घटनांची माहिती पोलिसांना देण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण त्यांना द्यावे.
– संवेदनशील विभागात पोलिस ठाण्यांमध्ये कोणत्याही आकस्मिक परिस्थितीला तोंड देण्यासाठी हेल्मेट, शिल्डस्, अश्रुधुर आणि शस्त्रे यासारख्या दंगल नियंत्रण उपकरणांनी सुसज्ज राखीव पोलिस पथके तयार ठेवायला हवे.
– पोलिस अधिकाऱ्यांनी हेल्मेटशिवाय आणि पुरेशी तयारी केल्याशिवाय हिंसाचार होत असलेल्या भागात जाऊ नये. त्यामुळे मनुष्यहानी होण्याची शक्यता असते. तसेच पोलिस अधिकाऱ्यांना गंभीर दुखापत किंवा मृत्यूला देखील सामोरे जावे लागू शकते.
– हिंसाचार झालेल्या ठिकाणी स्थानिक संवेदनशील नेत्यांशी संवाद ठेवून प्रकरण चिघळणार नाही, याची काळजी घेता येईल.
– हिंसाचारग्रस्त ठिकाणी सुरु असलेल्या बांधकाम साहित्याचा हिंसा भडकावण्यासाठी वापर केला जाऊ शकतो. हे लक्षात घेता, पोलिसांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन असे होऊ नये याची खबरदारी घ्यायला सांगावे.
– आपत्कालीन परिस्थितीत पोलिस, अग्निशमन दल (fire brigade) आणि रुग्णवाहिकांना अडथळा ठरणारे रस्त्यावरील टायर्स हटवण्यासाठी संबंधितांवर कारवाई करून रस्ते मोकळे ठेवायला पाहिजेत.
– हिंसाचाराच्या परिस्थितीचा गैरफायदा घेणाऱ्या आणि गोंधळ निर्माण करणाऱ्यांवर तात्काळ प्रतिबंधात्मक कारवाई करावी.
– हिंसाचाराला तोंड देण्यासाठी पोलिसांकडून दर सहा महिन्यातून एकदा नियमितपणे मॉकड्रिल करून घेणे गरजेचे आहे.
– रमजान (Ramajan) महिन्यात पोलिसांना अधिक दक्ष असणे आवश्यक आहे. कारण बहुतेक दंगली याच काळात झाल्या आहेत. हे कथितपणे बद्रच्या लढाईच्या नावाखाली चिथावणी देण्याशी जोडलेले आहे, जिथे रमजानच्या १७व्या दिवशी पैगंबर मोहम्मद (Prophet Mohammad) यांनी बद्र येथे आपल्या शत्रूंवर हल्ला केला होता.