भंपकपणाचे दुसरे नाव हे जितेंद्र आव्हाड; Pravin Darekar यांचा हल्लाबोल

165

जितेंद्र आव्हाडांची नौटंकी राज्यातील जनतेच्या समोर आली आहे. मनुस्मृती संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली आहे कि असा कोणत्याही प्रकारचा समावेश केला जाणार नाही. संपूर्ण महाराष्ट्रात भाजपने उत्स्फूर्तपणे आंदोलन केले आहे. राज्यातील जनतेने जितेंद्र आव्हाडांचा बुरखा टराटरा फाडला आहे. तसेच भंपकपणाचे दुसरे नाव हे जितेंद्र आव्हाड आहे. पब्लिसिटी हेच त्यांचे अंतिम ध्येय्य आहे, अशी टिका भाजपचे नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी केली.

जागा वाटपाचे अंतिम स्वरूप ठरायचे आहे. प्रत्येक पक्ष आपला उमेदवार उभा करत असतो. जसा लोकसभेला एकोप्याने, समन्वयातून मार्ग काढला तशाच पद्धतीचा विधानपरिषदेलाही महायुतीच्या घटक पक्षांच्या नेत्यांची चर्चा होऊन मार्ग निघेल. विधानपरिषदेवरून आमच्यात कठल्याही प्रकारचे वितष्ट होईल असे वाटत नाही. निवडणुका संपलेल्या आहेत, राज्यात भीषण दुष्काळ पडला आहे. माणुसकीच्या धर्तीवर निवडणूक आयोग याबाबत शिथिलता देऊ शकतात. अशा प्रकारच्या शिथिलता जेव्हा आपत्ती, नैसर्गिक संकट आले तेव्हा दिल्या आहेत. तशाच प्रकारची शिथिलता देण्याची मागणी राज्य सरकारने आयोगाकडे केली आहे ती आयोग मान्य करेल आणि राज्यातील दुष्काळग्रस्ताना दिलासा मिळण्यासाठी राज्य सरकार गतीने पावले उचलेल.

(हेही वाचा Jitendra Awhad यांच्या निषेधार्थ रिपब्लिकन पक्षाचे राज्यभर आंदोलन – रामदास आठवले)

विरोधी पक्षनेता अस्तित्वहीन 

विजय वडेट्टीवार यांच्यावर तोफ डागताना दरेकर म्हणाले की, गेले आठवडाभर विजय वडेट्टीवार कुठल्या बिळात लपले होते त्याचा पहिला शोध घ्या. महाराष्ट्रात एवढे विषय धगधगत आहेत आणि विरोधी पक्षनेत्याचे अस्तित्वच दिसत नाही. अस्तित्व शून्य आहे असा टोला लगावला.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.