स्वयंपुनर्विकास : सर्वात उत्तम उपाय; आमदार Pravin Darekar यांचे प्रतिपादन

120
स्वयंपुनर्विकास : सर्वात उत्तम उपाय; आमदार Pravin Darekar यांचे प्रतिपादन
  • प्रतिनिधी

मुंबईतील बोरिवली (पश्चिम) येथील गोराई समाधान सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या स्वयंपुनर्विकास प्रकल्पाचे भूमिपूजन प्रजासत्ताक दिनी आमदार प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांच्या हस्ते पार पडले. यावेळी त्यांनी स्वयंपुनर्विकास हाच सर्वात योग्य उपाय असून, लोकांच्या मनातील विश्वास पुढे न्यायचा असल्याचे प्रतिपादन केले.

आ. दरेकर (Pravin Darekar) म्हणाले की, स्वयंपुनर्विकास हा त्यांचा ध्यास आहे. “मध्यमवर्गीय मराठी माणसाचे मोठ्या घराचे स्वप्न स्वयंपुनर्विकासातून पूर्ण होऊ शकते. आजपर्यंत मुंबई जिल्हा बँकेत १६०० प्रस्ताव आले असून, ३६ प्रकल्पांना कर्ज मंजूर झाले आहे. त्यातील १२ प्रकल्प पूर्ण झाले असून, रहिवासी नव्या घरी राहायला गेले आहेत,” असे त्यांनी सांगितले.

(हेही वाचा – Tiger Reserve : बहेलिया शिकाऱ्यांचा पुन्हा एकदा महाराष्ट्रात शिरकाव ; चंद्रपुरात टोळीच्या म्होरक्याला अटक)

स्वयंपुनर्विकासाच्या अंमलबजावणीसाठी मुंबई जिल्हा बँकेकडे निधी कमी पडल्यामुळे राज्य सहकारी बँकेकडून १५०० कोटी आणि सहकार महामंडळाकडून १००० कोटी निधी मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत या प्रकल्पासाठी चर्चा होणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

दरेकर (Pravin Darekar)  पुढे म्हणाले, “आज मुंबईतील मराठी माणूस घरासाठी पालघर, वसई, विरारपर्यंत जात आहे. स्वयंपुनर्विकासामुळे विकासकांच्या नफ्याचा मोठा भाग सोसायटीलाच मिळेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेला राजाश्रय दिला असून, प्रकल्प जलद पूर्ण व्हावा, यासाठी सरकार पाठीशी आहे,” असे सांगून त्यांनी प्रकल्पाच्या यशस्वीतेबाबत आश्वस्त केले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.