Prayagraj Kumbh Mela 2025 : वाहतूक कोंडीनंतर प्रशासनाने उचलली गंभीर पावले; ५२ वरिष्ठ अधिकार्‍यांची नियुक्ती

Prayagraj Kumbh Mela 2025 : १० फेब्रुवारीपासून ते १३ फेब्रुवारी सकाळी ८ वाजेपर्यंत महाकुंभक्षेत्री वाहनांना प्रवेशबंदी आहे.

46

प्रयागराड येथील कुंभनगरीत झालेली वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी आणि भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयागराज येथील पोलीस आयुक्त विजय विश्‍वास पंत अन् पोलीस उपमहानिरीक्षक अजय पाल शर्मा रस्त्यावर उतरले आहेत. (Prayagraj Kumbh Mela 2025) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी १० फेब्रुवारीच्या सायंकाळी विशेष कृती दलाचे प्रमुख अमिताभ यश यांना विशेष विमानाने प्रयागराज येथे पाठवले आहे, तसेच मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार ५२ नवीन आय.ए.एस्, आय.पी.एस्. आणि पी.सी.एस्. अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. सर्वांना त्वरित प्रयागराज गाठून सेवेत रुजू होण्यास सांगण्यात आले आहे.

(हेही वाचा – Municipal schools : महापालिका शाळांमधील मुलांची सहल किडझेनिया पार्क आणि राणीबागेत, प्रत्येक विद्यार्थ्यामागे येणाऱ्या खर्चावर शंका)

१२ फेब्रुवारी या दिवशी माघ पौर्णिमेनिमित्त (Magh Purnima) संगमस्नान करण्यासाठी प्रयागराज (Prayagraj) येथे मोठ्या संख्येने भाविक येत आहेत. १० फेब्रुवारीपासून ते १३ फेब्रुवारी सकाळी ८ वाजेपर्यंत महाकुंभक्षेत्री वाहनांना प्रवेशबंदी आहे. केवळ प्रशासकीय आणि आरोग्य विभागांच्या वाहनांना प्रवेश असेल.

शहरात वाहतूक कोंडी होणार नाही – पोलीस आयुक्त

प्रयागराजचे पोलीस आयुक्त तरुण गाबा म्हणाले की, भाविकांना सुखद अनुभव मिळावा, याची आम्ही निश्‍चिती करत आहोत. आता लक्ष्मणपुरी, जौनपूर, प्रतापगड, चित्रकूट, रिवा, वाराणसी यांसह सर्व मार्गांवर वाहतूक सुरळीत आहे. शहरात वाहतूक कोंडी नाही. वाहने वेगवेगळ्या वाहनतळांच्या ठिकाणी पाठवली जात आहेत. लोकांनी केवळ संगमाकडे जाण्याचा प्रयत्न करू नये. माघ पौर्णिमेपूर्वी कुंभमेळा परिसर आजपासून ‘नो व्हेइकल झोन’ असेल. कल्पवासींसाठी स्वतंत्र वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे. चुकीच्या पद्धतीने लावण्यात आलेली वाहने क्रेनच्या साहाय्याने उचलली जात आहेत. (Prayagraj Kumbh Mela 2025)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.