![](https://www.marathi.hindusthanpost.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-2025-02-13T175404.841-696x377.webp)
महाकुंभक्षेत्री सेक्टर क्र. १९ मधील मोरी-मुक्ती मार्ग चौक येथे लावण्यात आलेल्या सनातनच्या ग्रंथ आणि फलक प्रदर्शनाला साधू-संत, भाविक, तसेच मान्यवर यांच्याकडून उत्सर्फूत प्रतिसाद लाभला. १० जानेवारी ते १२ फेब्रुवारी या कालावधीत या ग्रंथप्रदर्शनाला एकूण ७५ हजारांहून भाविकांनी भेट दिली. यामध्ये भारतातील अनेक राज्यांसह अमेरिका, रशिया, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, नेपाळ आदी देशांतील भाविकांचा समावेश आहे.
या प्रदर्शनात अध्यात्म, आयुर्वेद, बालसंस्कार, धर्मशास्त्र, आपत्काळ आदी विषयांवरील ग्रंथ बंगाली, इंग्रजी, गुजराती, हिंदी, कन्नड, मल्याळम, मराठी, उडिया, तामिळ आणि तेलुगु या भाषांमध्ये उपलब्ध आहेत. या सर्व ग्रंथांमध्ये प्रामुख्याने आचारधर्मावर आधारित ग्रंथांकडे (उदा. देवळात दर्शन कसे घ्यावे ?’, ‘प्रदक्षिणा कशा घालाव्यात ?’ इ.) भाविकांचा सर्वाधिक कल असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे सनातनच्या सर्व भाषांतील ग्रंथांपैकी बंगाली भाषेतील ग्रंथांना सर्वाधिक मागणी आहे. या प्रदर्शस्थळी लावण्यात आलेल्या फलक प्रदर्शनालाही भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अनेकांनी स्वतःच्या फोनमध्ये या सर्व फलकांची छायाचित्रे काढून घेतली.
(हेही वाचा – भाजपाच्या Chitra Wagh यांची आदित्य ठाकरेंवर सडकून टीका; म्हणाल्या, दिल्लीत हुजरेगिरी…)
यासह सनातनच्या वतीने ई-रिक्शा, फिरते ग्रंथप्रदर्शन, म्हणजेच ‘मोबाईल स्टॉल’ आदी माध्यमांतूनही ११ हजारांहून अधिक जिज्ञासूंनी सनातनच्या ग्रंथांचा लाभ घेतला. अनेक जिज्ञासूंनी त्यांच्या राज्यांमध्ये सनातनच्या ग्रंथ वितरणासाठी जागा उपलब्ध करून देऊन सनातनच्या कार्यात सहभागी होण्याचे आश्वासन दिले.
सनातनचे ग्रंथ ‘ऑनलाईन’ उपलब्ध ! : सनातनचे विविध विषयांवरील १३ भाषांतील ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने https://sanatanshop.com/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community