प्रयागराजच्या (Prayagraj) हंडिया (Handia) परिसरात नववी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थींनीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. पोलिसांनी या घटनेत सहभागी असलेल्या पाच आरोपींना अटक केली आहे, ज्यात ई-रिक्षा चालक आमिर (Aamir), त्याचा भाऊ शाहरुख, अब्बा हारून (Abba Haroon), अम्मी आशिया आणि हॉटेल संचालक बैजनाथ उर्फ आझाद यांचा समावेश आहे.
( हेही वाचा : Mhada च्या वसाहतीतही ‘आपला दवाखाना’; वैद्यकीय सुविधेसाठी प्राधिकरणाचा पुढाकार)
आमिर (Aamir) हा ई-रिक्षा चालक असून विद्यार्थ्यांना शाळेत ने-आण करण्याचे काम तो करत असे. दि. ५ मार्च रोजी त्याने विद्यार्थीनीवर बलात्कार केला आणि तिला गप्प राहण्याची धमकी दिली. भीतीमुळे पीडितेने कोणालाही काहीही सांगितले नाही. त्यानंतर दि. २८ मार्च रोजी पीडित मुलगी उशिरापर्यंत घरी परतली नाही तेव्हा कुटुंबियांनी तिच्या शोधात आमिरचे घर गाठले, जिथे त्यांना धमक्या देण्यात आल्या. (Prayagraj)
काही वेळाने, पीडित विद्यार्थिनी तिथे आली आणि तिने सांगितले की आमिर तिला उत्तरांव पोलीस स्टेशन (Uttaran Police Station) परिसरातील रहीम पट्टी (Rahim Patti) येथील एका रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेला, जिथे तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला आणि तिला वेश्याव्यवसायात ढकलण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी १ एप्रिल रोजी पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आणि सर्व आरोपींना अटक केली. पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि हॉटेल सील करण्यात आले आहे. (Prayagraj)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community