मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न रंगमंच आणि वसईचा राजा उत्सव मंडळ, यांच्या संयुक्त विद्यमाने, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना विनंती पत्र पाठवले आहे. जवळजवळ 150 कलाकारांनी मिळून महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहिले आहे. मराठीला अनेक शतकांची परंपरा लाभली आहे, तरीही अद्याप भाषेला अभिजात दर्जा न मिळणे खेदाचं असल्याचे, या पत्रात सांगण्यात आले आहे. त्यामुळे लवकर हा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती या पत्राद्वारे राष्ट्रपतींना करण्यात आली आहे.
अनेकांनी भाषा समृद्ध केली
या पत्रात राष्ट्रपतींना मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी विनंती करण्यात आली आहे. अनेक शतकांची परंपरा लाभलेल्या मराठी भाषेचा प्रतिनिधी म्हणून, संवाद साधत असल्याचे या पत्रात म्हटले आहे. मराठी भाषेने भारताच्या सांस्कृतिक- साहित्यिक इतिहासात फार मोलाचे योगदान दिले आहे. श्री संत ज्ञानेश्वरांपासून आजच्या साहित्यिकांपर्यंत अनेकांनी या भाषेला समृद्ध केल्याचे या पत्रात म्हटले आहे.
( हेही वाचा: “इतर भाषांना अभिजात दर्जा मिळाला, मात्र मराठीला का नाही?” )
ही खेदाची गोष्ट
अशा मराठी भाषेला अजूनही अभिजात भाषेचा दर्जा मिळू नये, ही खेदाची गोष्ट आहे. आपण या विषयात लक्ष घालावे आणि सात दशके प्रलंबित राहिलेला हा प्रश्न मार्गी लावावा, असे या पत्रात सांगण्यात आले आहे. यासाठी मी आपल्याला राज्यस्तरीय युवा कोकण मराठी साहित्य परिषदेच्या व्यासपीठावरुन कळकळीची विनंती करत आहे. कृपया ती मान्य करावी, असं प्रसाद जंगम यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community