जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात मुंबई शहरातील प्रभादेवी आणि वरळी येथे झाड उन्मळून पडल्यामुळे झालेल्या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. झाड पडून झालेल्या दुर्घटनांच्या बाबत तीव्र चिंता व्यक्त केली जात असून या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर झाडे कापण्यात येणाऱ्या कामांची चौकशी करण्याचे निर्देश महापालिकेने दिल्याची माहिती मिळत आहे. ज्या ठिकाणी झाड पडून दुर्घटना घडली आहे, ते संबंधित झाड धोकादायक झाडांच्या यादीत असल्याचे याबाबत केलेल्या सर्वेत होते का किंवा त्या झाडाच्या फांद्यांची छाटणी केली होती या याची चौकशी करण्यात येणार असून याची जबाबदारी संबंधित विभाग कार्यालयांच्या सहायक आयुक्तांवरच सोपवण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे. (Tree Cutting)
मुंबईत पावसाळ्यातील वादळीवाऱ्यांमुळे झाड उन्मळून तसेच धोकादायक फांद्या तुटून दुर्घटना होण्याची भीती लक्षात घेता महापालिकेच्या उद्यान विभागाच्यावतीने रस्त्या लगतच्या झाडांच्या फांद्यांची छाटणी केली जाते. त्यामुळे पावसाळ्यापूर्व झाडांच्या धोकादायक फांद्यांची तसेच मृत झाडांची छाटणी केल्यानंतर मागील दोन दिवसांमध्ये झाड पडून जिवित हानी होण्याचे प्रकार घडत आहेत. जुलै महिन्यांच्या पहिल्याच आठवड्यात वरळीतील जांभोरी मैदान चौकात रात्री झाड पडून अमित जगताप हा ४५ वर्षी व्यक्ती गंभीर जखमी झाला. त्याचा रुग्णालयात दाखल केल्यांनतर मृत्यू झाला. या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी परळ बस आगार येथील सयानी मार्गावर कचरा गोळा करणाऱ्या कचरा वेचक महिलेचा झाड पडून मृत्यू झाला आहे. वर्षा कांतीलाल मेस्त्री असे कचरा वेचक महिलेचे नाव होते. या मार्गावरील झाड या महिलेच्या अंगावर पडल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु केईएम रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच या महिलेचा मृत्यू झाला होता, दोन दिवसांमध्ये झाड पडून दोघांचा मृत्यू झाला होता. त्या आधी १३ मे २०२४ रोजी वांद्रे हिल रोड येथे ३५ वर्षी इसमाचा मृत्यू झाला होता आणि ३८ वर्षीय इसम हा जखमी झाला होता. (Tree Cutting)
(हेही वाचा – Market : मुंबईतील मंडईंमधील परवाना नुतनीकरणाच्या शुल्कवाढीला स्थगिती, पण भाडेवाढ ५० टक्के!)
झाडांमुळे होणाऱ्या दुर्घटनांबाबत मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मुंबई शहर आणि उपनगरे यांच्या गुरुवारी पार पडलेल्या आढावा बैठकीत चिंता व्यक्त केली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांचे पदसिद्ध अध्यक्ष तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांनी जी झाडे पडली आहेत, ती महापालिकेने धोकादायक झाडे तसेच झाडांच्या धोकादायक फांद्या छाटण्यासाठी केलेल्या सर्वेत यांचा समावेश होता याची चौकशी करावी असे निर्देश संबंधित विभागांच्या सहायक आयुक्तांना दिले असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे ज्याठिकाणी झाडे पडून लोकांचे जीव गेले किंवा जखमी होण्याची वेळ आली आहे, त्याठिकाणी केलेल्या वृक्ष छाटणीच्य कामांचीही चौकशी होणार आहे. त्यामुळे या दुर्घटनांच्या पार्श्वभूमींवर झाडांच्या छाटणीच्या कामांचीही चौकशी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Tree Cutting)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community