Vasai Fort मध्ये प्री वेडिंग करणाऱ्यांचा सुळसुळाट; दुर्गप्रेमींचा संताप    

592

शूरवीरांच्या शौर्याची पराकाष्ठा सोसून इतिहास (Fort History) रचणाऱ्या शूरवीरांची साक्ष आजही डौलाने उभ्या असलेल्या ऐतिहासिक वास्तूत प्री वेडिंग (fort pre wedding photoshoot), चित्रपट आणि दुरचित्र वाहिन्यांच्या मालिकांचे चित्रीकरण हे इतिहास अभ्यासक, संशोधक आणि दुर्गमित्र दुर्ग संवर्धकांच्या (Fort conservation) जिव्हारी लागलं असून, केंद्रीय पुरातत्व विभागाच्या कार्यावर संताप व्यक्त केला आहे.  (Vasai Fort)   

मिळलेlल्या माहितीनुसार, केंद्रीय पुरातत्व विभाग जंजिरे वसई कर्मचारी वर्गाचा मनमानी कारभार हा त्याला कारणीभूत असल्याचे किल्ल्यावर सुरू असणाऱ्या बेताल व बेभान प्री वेडिंग छायाचित्रणामुळे दिसून येत असल्याचे ते सांगत आहेत. याबाबत दुर्गमित्र, विविध सामाजिक संघटना, इतिहासप्रेमी, अभ्यासक, संशोधक यांच्या माध्यमातून सातत्याने नियमितपणे विरोध प्रकट करण्यात येत आहे. किल्ल्यावर नेमण्यात आलेले सुरक्षारक्षक, अधिकारी याबाबत आजही स्पष्ट उपाययोजना करीत नाहीत ही बाब वेळोवेळी समोर येत आहे. केंद्रीय पुरातत्व विभाग मुंबई, वसई मंडल मुख्य अधिकारी वर्गानी किल्ले वसई मोहिमेच्या दुर्गमित्रांनी दिलेल्या निवेदनाची दखल घेत किल्ल्यावर नियमावली फलक लावले. परंतु हे फलक जागोजागी दुर्लक्षित अवस्थेत आहेत, किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारात एकही सूचना फलक उपलब्ध नाही. ११ फेब्रुवारी २०२० रोजी मुख्य सायन मुंबई कार्यालयाने जाहीर केलेल्या अधिकृत पत्रकात कोणत्याही प्रकारचे प्री वेडिंग छायाचित्रण वसई किल्ल्यावर पूर्णपणे बंदी असल्याचे नमूद केले आहे.

(हेही वाचा – ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे PM Narendra Modi यांच्या हस्ते होणार उद्घाटन)

जंजिरे वसई किल्ल्यावर पुरातत्व विभाग सोईची मनमानी नियमावली व आर्थिक गणिते पूर्ण करण्यात धन्यता मानत किल्ल्याचा बळी देणार का? असा सवाल दुर्गमित्र उपस्थित करत आहेत. या सोईच्या नियमावली बाबत दुर्गमित्र संघटना लवकरच तीव्र आंदोलन करणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. मुख्य सायन पुरातत्व विभाग अंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या पत्रकास वसई विभाग मंडल विभाग अंतर्गत केराची टोपली दाखवण्यात आल्याचे चित्र समोर आले असून एकंदरीत सर्व गोष्टी आर्थिक गणितावर सुरू असल्याचा आरोप होत आहे. 

वसई किल्ल्यावर नियमितपणे होणारी सुरक्षा रक्षक बदली (vasai fort security guard) हेही यामागचे गुप्त कारण असल्याचे दिसून आलेले आहे किल्ले वसई मोहिमेचे सदस्य व इतिहास अभ्यासकांनी मागील दोन दिवस प्रत्यक्ष भेटीने किल्ल्यावर केलेली पाहणीत अनेक वास्तूंमध्ये प्रेमी युगलांचे चाळे, प्री वेडिंग, विना परवाना प्रोजेक्ट शूटिंग, कॉलेज तरुणांची अवेळी गर्दी इत्यादी अनेक दुर्दैवी प्रकार पाहण्यात आले. याबाबत प्रत्यक्षस्थळी उभे असणारे सुरक्षारक्षक पूर्णपणे आर्थिक मौन पाळत असल्याचे लक्षात आले असेही दुर्गमित्र सांगत असून हे प्रकार लागलीच थांबवावेत अशी विनंती करत हे मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

(हेही वाचा – ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे PM Narendra Modi यांच्या हस्ते होणार उद्घाटन)

तसेच गडकिल्ल्यांवर चित्रीकरणाच्यावेळी बेशिस्तपणे वावर, धूम्रपान, कोठेही कचरा टाकणे, धुंकणे हे त्या वास्तूसाठी आपले सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूरवीरांचा अवमान करणारे ठरत असल्याची भावना दुर्गमित्रांमध्ये निर्माण होत आहे. शूरवीरांचे पावित्र्य हे राखले जात नाही असे त्यांचे म्हणणे आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.